एक्स्प्लोर

Shantigiri Maharaj : अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांना मिळालं 'बादली' चिन्ह, नाशिक लोकसभेत देणार टफ फाईट

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना निवडणुकीसाठी 'बादली' चिन्ह देण्यात आले आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शांतीगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) माघार घ्यावी, यासाठी महायुतीकडून (Mahayuti) सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र शांतीगिरी महाराज शेवटपर्यंत अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. शांतीगिरी महाराजांना निवडणुकीसाठी बादली चिन्ह देण्यात आले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे (Hemant Godse), महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्यात लढत होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून करण गायकर (Karan Gaikar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने हेमंत गोडसेंना मोठा फटका बसेल, असे बोलले जात आहे. 

ही निवडणूक लढायची आणि जिंकायची - शांतीगिरी महाराज

शांतीगिरी महाराज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. महायुतीकडून तिकीट मिळण्याची आमच्या भक्त परिवाराला अपेक्षा होती. स्वार्थीपणा मनुष्य सोडत नाही, महायुतीने त्यांची उमेदवार जाहीर केलाय. त्यामुळे आम्ही अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय, असे त्यांनी म्हटलंय. 

खरं राजकारण कसे असते हे दाखवणार - शांतीगिरी महाराज 

ते पुढे म्हणाले की, शिवसेनेकडून मी फॉर्म भरला पण ती फक्त आमच्या वकिलांनी एक प्रक्रिया केली होती. आमचे होर्डिंग लागले आहेत. लढा हिताचा, संघर्ष राष्ट्रहिताचा हा उद्देश समोर ठेऊन आम्ही लढतोय. खरं राजकारण कसे असते हे दाखवणार आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आजचे राजकारण गलिच्छ झाले आहे, यात बदल होणे गरजेचे आहे. महायुतीचे गिरीश महाजन, दादा भूसे, भाऊसाहेब चौधरी अशा अनेकांनी संपर्क साधला.  अंजनेरी जन्मस्थानाचा विकास करणार आहे. शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव आणि त्यांचे इतर प्रश्न आम्ही सोडवणार आहोत.  लढायचं आणि जिंकायचं, असा आमचा निर्धार आहे, असे शांतीगिरी महाराजांनी म्हटले आहे. 

नाशिकमधून 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात 

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 39 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 36 उमेदवार पात्र ठरले असून पाच जणांनी माघार घेतली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दिंडोरी लोकसभेत एकूण 20 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 15 उमेदवार पात्र ठरले. पाच उमेदवारांनी माघार घेतली असून 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  

आणखी वाचा 

भाजपचे इच्छुक उमेदवार माघारीसाठी शेवटच्या क्षणी पोहोचले, हेमंत गोडसेंची उडाली एकच धावपळ, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट, आधी तरुणीला संपवलं, नंतर तरुणाने स्वत:च्या आयुष्याचा शेवट केला; नाशिकमधील 'त्या' घटनेमागचं धक्कादायक कारणही आलं समोर
Ashok Kharat: अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
अशोक खरातविरोधात ईडीचे तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र; रिमोटचा साप, 2 लाखांची चिंचेची बी ते 142 बेनामी खात्यांचा पर्दाफाश
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget