Sanjay Raut : '240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाहांना कळणारही नाही'; संजय राऊत नाशिकमधून गरजले
Sanjay Raut : आम्ही सगळे मिळून 240 खासदार आहोत. हे सगळे मिळून 240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
Sanjay Raut नाशिक : आज इंडिया आघाडीचे (India Aghadi) 240 खासदार संविधानाची प्रत घेऊन संसदेत प्रवेश करतील. काँग्रेसचे (Congress) 100 हून अधिक खासदार, आम्ही सगळे मिळून 240 खासदार आहोत. हे सगळे मिळून 240 चे 275 खासदार कधी होतील, हे मोदी-शाह यांना कळणारही नाही, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, आज इंडिया आघाडीचे सर्व नवनिर्वाचित खासदार हे संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. 240 खासदार एकत्र संसदेत प्रवेश करतील. प्रवेश करताना प्रत्येकाच्या हातात संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या संदेशासह 240 खासदार संसदेत प्रवेश करतील.
240 चे 275 खासदार कधी होतील हे मोदींना-शाहांना कळणारही नाही
आता मोदी- शाह यांच्या इस्ट इंडिया कंपनीला कळेल की, विरोधी पक्ष काय असतो. गेल्या 10 वर्षात विरोधी पक्षाला चिरडण्याच्या प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष प्रचंड ताकद घेऊन संसदेत जात आहे. मोदी-शाह यांच्या समोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. काँग्रेसचे 100 हून अधिक खासदार, आम्ही सगळे मिळून 240, हे सगळे मिळून 240 चे 275 कधी होतील, हे मोदी शाह यांना कळणारही नाही.
बहुमत नसले तरी पंतप्रधानपदाची शपथ घेतली
विरोधी पक्ष नेत्यांचे नाव अद्याप जाहीर झालेले नाही, असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, लोकशाही आणि संविधान या मार्गाने काही निवडी करायच्या असतात. त्यांच्यासारखी आमची इस्ट इंडिया कंपनी नाही. कोणाला कधीही नेमले, बहुमत नसले तरी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, असा टोला त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
संदीप गुळवे पहिल्या फेरीतच निवडून येतील
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर आले असताना जळगाव येथील सभेनंतर शिक्षक मतदारांना पैसे वाटप झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला. तसेच महिला मतदारांना नथ आणि पुरुष मतदारांना कपडे वाटत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी केला. यावर संजय राऊत म्हणाले की, हे सरकारच भ्रष्टाचारातून निर्माण झालेले आहे. त्यातून नथी, साड्या आणि कपडे वाटले असतील. संदीप गुळवे हे पहिल्या फेरीतच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आणखी वाचा