एक्स्प्लोर

नाशकात पावसाचा धुमाकूळ, एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ट्रान्सफॉर्मर फुटले, 70 ते 80 गावांची बत्ती गुल

Nashik Rain Update : नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पावसाचा फटका बसला आहे. ट्रान्सफॉर्मर फुटल्याने 70 ते 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात रविवारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने (Rain) धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. तसेच नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला (Eklahare Thermal Power Station) पावसाचा फटका बसला. 

नाशिक शहरासह आजूबाजूच्या परिसरातील काल रात्रीपासून काही गावांचा वीज पुरवठा खंडित (Power supply cut off) झालेला होता. तर सकाळपासून शहरातील काही भागांचा वीज पुरवठा खंडित आहे. वीज पुरवठा का? खंडित झाला याबाबत माहिती घेतली असता दोन ट्रान्सफॉर्मरमध्ये (Transformer) तांत्रिक बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे समोर आले आहे.

70 te 80 गावांची बत्ती गुल

मध्यरात्री झालेल्या पावसात औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहराच्या काही भागासह 70 ते 80 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीजनिर्मिती केंद्रातील 132 के व्ही सब स्टेशनमधील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला असून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.  

मालेगाव, चांदवडला जोरदार पाऊस

नाशिकच्या मालेगाव (Malegaon) शहर व तालुका परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. पाऊस बरसल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या वादळी पावसामुळे मालेगाव परिसरातील काही वृक्ष उन्मळून पडले.  चांदवड (Chandwad) शहरासह तालूक्यात मुसळधार पाऊस झाला असून चांदवड शहरातील सोमवार पेठ भागात रस्त्यांवरुन नदीच्या स्वरूपात पाणी वाहत होते. रस्त्यावरील जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील एक कार या पाण्याच्या प्रवाहात उलटी वाहत गेली. 

देवळ्यात दोघांचा मृत्यू

नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे (umrane) येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असताना कांद्याच्या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे पिता पुत्र पावसामुळे या शेडमध्ये निवाऱ्यासाठी थांबलेले असताना शेड कोसळले त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिसगाव येथील इंदिरानगर (Indiranagar) परिसरात वीज कोसळल्याने एक बैल व आकाश देवरे नामक 20 वर्षीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. तर, उमराणे, तिसगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्याने येथील 20 ते 25 कांदा व्यापाऱ्यांचे मोठे लोखंडी शेड अक्षरशः कोसळून पडले.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Rain : झाडे कोसळली, 25 कांदाशेड उद्ध्वस्त, दोघांचा दुर्दैवी अंत; नाशिकला पावसानं चांगलंच झोडपलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget