Nashik Police Bharati : नाशिकमध्ये एका जागेसाठी अकरा उमेदवार, लेखी परीक्षेसाठी यादी संकेतस्थळावर उपलब्ध
Nashik Police Bharati : नाशिक (Nashik) जिल्हा पोलिस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
Nashik Police Bharati : नाशिक (Nashik) जिल्हा ग्रामीण पोलीस भरती (Police Bharti) 2021 पोलीस शिपाई लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून पोलीस मैदानी चाचणी उमेदवारांमधून 1:10 या प्रमाणात 1 हजार 869 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु असून नाशिक ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. नाशिकमध्ये मैदानी (Police Bharti Exam) दिलेल्या 11 हजार 244 उमेदवारांपैकी 4 हजार 518 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले होते. त्यांच्या 1:10 या प्रमाणात 1 हजार 869 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असून, भरती प्रक्रियेत सहभागी उमेदवारांना ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे. त्यानुसार हे उमेदवार लेखी परीक्षेसाठी प्रविष्ट होणार आहेत. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी तातडीने नावांची खात्री करून घ्यावी असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस (Nashik rural Police) दलात पोलीस शिपाई यांची 164 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात झाल्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी एकूण 18 हजार 935 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यांची मैदानी चाचणी पोलीस मुख्यालयाच्या आडगाव येथील कवायत मैदानावर 4 ते 20 जानेवारीदरम्यान घेण्यात आली. या चाचणीसाठी अर्ज केलेल्या एकूण 18 हजार 935 उमेदवारांपैकी 13 हजार 86 उमेदवार भरती प्रक्रियेसाठी उपस्थित होते. यातील 11 हजार 244 उमेदवार पात्र ठरल्याने त्यांच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्यानंतर उमेदवारांना मैदानी चाचणीत मिळालेले गुण त्या त्या दिवशी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील शंका व तक्रारींचे निरसन करण्यात आल्यानंतर पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचणी दिलेल्या 11 हजार 244 उमेदवारांपैकी 4 हजार 418 उमेदवारांना 25 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहे.
6 हजार 723 उमेदवार गैरहजर...
नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या 21 हजार 49 उमेदवारांपैकी 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. तर सुमारे 6 हजार 723 उमेदवार या भरती प्रक्रियेत गैरहजर राहिले. उमेदवारांना मिळालेले गुण त्याच दिवशी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार हरकत नोंदविल्यानंतर आता थेट लेखी परीक्षेसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या उमेदवारांची यादी नाशिक ग्रामीण पोलीसांच्या पोलीस भरती संकेतस्थळावर लावण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी आपल्या नावाची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.