North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा इथे...
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक ताज्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
North Maharashtra News LIVE Updates : उत्तर महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक ताज्या बातम्या मिळवा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नाशिक ग्रंथोत्सव 2023 : 'या' दिवशी होणार उद्घाटन
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय नाशिक ग्रंथोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मंगळवार 27 फेब्रुवारी, 2024 रोजी मु. श. औरंगाबादकर सभागृह, सार्वजनिक वाचनालय येथे होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे यांनी दिली आहे.
वडाळा गावात टवाळखोरांचा धुमाकूळ, आठ जण ताब्यात
वडाळा गावात स्थानिक टवाळखोरांनी पुन्हा एकदा नागरिकांना वेठीस धरुन त्यांच्या जीवास धोका निर्माण केल्याची घटना घडली. हातात लाठ्याकाठ्या घेऊन या टवाळखोरांनी नागरिकांच्या घरांवर दगडफेक करुन एकमेकांना चोपून धुमाकूळ घालण्यात आला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे.
























