Nashik News : नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी; शहरात एकाचवेळी डेंग्यू आणि फ्लू रुग्णांमध्ये वाढ
अवघ्या दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नाशिक शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) डेंग्यूचा कहर सुरु असतानाच आता स्वाईन फ्लूने बाधित रुग्णाचा उपचार घेताना मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळेदोन जणांचा मृत्यू असून 31 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी गेला आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नाशिक शहरात डेंग्यू आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नाशिकमध्ये रोगराई वाढीस लागल्याने डास उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणी औषध आणि धूर फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
धूर फवारणी होत नसल्याचा आरोप
शहरात धूर फवारणी नावालाच असून प्रत्यक्षात ती होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तसेच जेथे फवारणी होते. तेथे केवळ धूराचीच फवारणी होते, डासांना प्रतिबंध घातला जाईल ती, औषधी धूर फवारणीमध्ये नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. लक्षणे आढळल्यास नागरिकांनी रुग्णालयात जाऊन त्वरित तपासणी करुन घ्या असे आवाहन नागरिकांना केले आहे.
मे महिन्यात तब्बल 33 पॉझिटिव्ह आढळून आले
दुसरीकडे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नाशिकमध्ये डेंग्यूची साथ सुरु आहे. जानेवारी ते मे या चार महिन्यात रुग्णसंख्या 104 वर पोहोचली आहे. मे महिन्यात तब्बल 33 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक डेंग्यू हॉटस्पॉट झाला आहे. पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शंभरी पार गेल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिघण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
