एक्स्प्लोर

Nashik Crime : स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Nashik Crime News : विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून नाशिकच्या तरुणांची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime News नाशिक : विविध कंपन्यांचे स्टॉक (Stock) व आयपीओ (IPO) घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात भामट्यांनी दोन तरुणांची सुमारे 79 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व त्याचा साक्षीदार या दोन तरुणांशी वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप क्रमांकधारक आरोपींनी संपर्क साधला. नंतर या दोन तरुणांना स्टॉक डिसेक्शन ग्रुप व मोमेंटम स्टॉक कम्युनिटी अशा नावांनी स्थापन केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित आरोपींनी अप्पर सर्किटच्या स्टॉकबद्दल फिर्यादी व त्याच्या साक्षीदाराला वेळोवेळी माहिती दिली. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपींनी त्यांच्या कंपनीच्या बनावट कर्मा कॅपिटल ट्रेडिंग, व्हाईट व यांसारख्या प्लॅटफॉर्मवर दोघा तरुणांना खाते सुरू करण्यास भाग पाडले.

स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

कालांतराने या अॅपवर विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्याकरिता आरोपींनी दिलेल्या विविध बँकांच्या खात्यांवर फिर्यादी व साक्षीदार यांना 7 लाख 15 हजार इतकी रक्कम गुंतविण्यास सांगितली. त्यानुसार फिर्यादी व साक्षीदार यांनी दि. 15 सप्टेंबर 2023 ते दि. 15 मार्च 2024 या कालावधीत इंटरनेट, फोन व बँक खात्यांद्वारे वेळोवेळी 78 लाख 78 हजार 600 रुपये इतकी रक्कम आरोपींनी सांगितल्याप्रमाणे जमा केली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रकमेची गुंतवणूक करूनही अपेक्षित फायदा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

वीज चोरी प्रकरणी दोन गुन्हे दाखल

शहरातील कुमावतनगर व निलगिरी बाग परिसरात 23 हजार रुपयांची वीजचोरी करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजचोरीची पहिली घटना कुमावतनगर येथे घडली. अनिता क्षीरसागर (रा. कुमावतनगर, पेठ रोड, पंचवटी) यांनी घराच्या समोरील पिलरमध्ये दोन फुटांची कॉपर वायर वापरून काळ्या रंगाची टू कोअर आर्म केबल वापरून घरगुती कारणासाठी अनधिकृतपणे वीज वापरून 1 हजार 117 युनिटची वीजचोरी करून महावितरण कंपनीचे 16 हजार 600 रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  दुसरी कारवाई निलगिरी बाग परिसरात करण्यात आली.निर्मला कमलेश श्रीवास्तव (रा. निलगिरी बाग झोपडपट्टी, पंचवटी) या महिलेने घरगुती कारणासाठी घराच्या समोरील पिलरवरून 285 युनिटची वीजचोरी करून महावितरणचे 6 हजार 325 रुपयांचे आर्थिक नुकसान केले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Crime : पत्नी सोडून गेल्याने पती निराश, दारूच्या नशेत पतीनं असं काही केलं की पोलीसही चक्रावले

Nashik Crime : सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
Embed widget