एक्स्प्लोर

Nashik News : येवल्यात भुजबळ-जरांगे समर्थकांमध्ये जोरदार राडा, 44 जणांविरोधात गुन्हा दाखल

Nashik News : रविवारी मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नाशिक : येवल्यात (yeola) मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले. भुजबळ समर्थनार्थ व मराठा आंदोलक यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. आता शिवसृष्टी स्वयंसेवक, आंदोलक कार्यकर्ते अशा एकूण 44 जणांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे काल येवला दौऱ्यावर आहेत. मनोज जरांगे यांनी येवल्यात आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर त्यांना येवल्यात शिवसृष्टी उभारण्यात आली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील शिवसृष्टी उभारलेल्या ठिकाणी शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी आले. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते आपल्या सभास्थळाच्या दिशेला निघाले. पण यावेळी अचानक मराठा कार्यकर्ते आणि मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं. 

मराठा आंदोलकांचा आरोप 

पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी शिवसृष्टीसमोर ठिय्या मांडला. मनोज जरांगे पाटील हे काल येवल्यात आले होते. ते येवल्यात आले तेव्हा त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आम्ही इथे आलो. जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. यानंतर आम्ही परतत असताना भुजबळांच्या काही समर्थकांनी शिवाजी महाराजांच्या प्रांगणात जरांगे पाटील यांच्याबाबत अपशब्द वापरले, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलकांनी दिली होती.

मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

मराठा आंदोलक ठिय्या मांडल्यानंतर प्रचंड आक्रमक झाले. काही मराठा कार्यकत्यांनी रास्ता रोको केला. मराठा आंदोलकांनी मनमाड नगर राज्य मार्गावरील विंचूर चौफुलीवर रास्ता रोको केला. भुजबळ समर्थकांनी मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत आंदोलकांनी रास्ता रोको सुरू केला. मराठा आंदोलकांच्या आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी मराठा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

44 जणांविरोधात गुन्हा दाखल 

रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना रास्ता - रोको मागे घेण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. यानंतर शिवसृष्टी स्वयंसेवक, आंदोलक कार्यकर्ते व इतर अशा 40 ते 44 जणांविरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वाहतुकीस अडथळा, सार्वजनिक उपद्रव, जमाव गोळा करणे, तसेच पोलिसांनी सूचना देवूनही अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा

Sanjay Raut : बाबा सिद्दिकींच्या हत्येची सूत्र गुजरातच्या तुरुंगातून; संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले तीन सिंघम असतानाही...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Ausa Bag Checking : औसा येथे पुन्हा एकदा बॅगची तपासणी; सलग दुसऱ्यांदा तपासणीCM Eknath Shinde Angry : 'गद्दार'घोषणा शिंदे संतापले; काँग्रेस कार्यालयात घुसन विचारला जाबDevendra Fadnavis Speech Dahanu : शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हजार जमा करणार ,देवेंद्र फडणवीसांची घोषणाNarendra Modi Speech Chimur|मराठीतून भाषणाला सुरुवात, मविआ म्हणजे भ्रष्टाचाराची खिलाडी, मोदींची टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
शिंदेंकडील 8 आमदार 1 मंत्री परत येणार, आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर श्रीकांत शिंदेंचा पलटवार; दिलं चॅलेंज
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Video: मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा बॅग तपासली; दरवेळेला मीच पहिला गिऱ्हाईक म्हणत ठाकरेंकडून पुन्हा व्हिडीओ शूट
Ajit Pawar : अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
अजितदादांची श्रीरामपूरमध्ये मोठी खेळी! जेलमध्ये असणाऱ्या माजी आमदाराच्या कुटुंबियांची घेतली अचानक भेट, पक्षाची ताकद वाढणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
नाशिक पूर्वमध्ये राजकारण तापलं! 'माझ्याकडे निवडणुकीचा अजेंडा' राहुल ढिकलेंच्या वक्तव्यावर गणेश गीतेंचा हल्लाबोल, म्हणाले 'तुमचा अजेंडा...'
Maharashtra Election 2024: हरियाणात जे घडलं ते टाळायचं असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
उद्धव ठाकरेंना आत्ताच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा, अन्यथा... केजरीवालांच्या 'आप'ची मोठी मागणी
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
नक्षलवादाला लगाम घालत या भागात आम्ही उद्योग आणले; चंद्रपुरात मोदींचं भाषण, काँग्रेस, मविआवर हल्लाबोल
Sharad Pawar: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस अन् भाजपला दणका! अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत 10 नगरसेवकांनी फुंकली तुतारी
Embed widget