एक्स्प्लोर

Nashik MLA List : नाशिकमध्ये कुणाचे वर्चस्व? कोणत्या पक्षाची किती आमदार? संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

Nashik MLA List : सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, तर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

Nashik MLA List 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. राज्यात 2019 सालच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित असल्याने सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. 2019 साली भाजप (BJP) आणि शिवसेना युती होती. त्यावेळी शिवसेना पक्ष 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपल्यानंतर राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीने दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  यांची सत्ता आहे. लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीला मोठा फटका बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे नाशिकमधून निवडून आले आहेत. आता आगामी विधानसभा निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार? हे आता काळच ठरवणार आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सध्या वर्चस्व कुणाचे आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

नाशिक जिल्ह्यात कुणाचं प्राबल्य?

नाशिकमध्ये एकूण 15 विधानसभा मतदारसंघ येतात. यात नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नांदगाव, येवला, बागलाण, कळवण, दिंडोरी, निफाड, चांदवड या मतदारसंघांचा समावेश आहे.  नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सध्या नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा आमदार आहेत. यापाठोपाठ भाजपचे पाच आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार, तर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी एक आमदार आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य नाशिकमध्ये अधिक असल्याचे दिसून येते. तर भाजपदेखील 'काटे की टक्कर' देईल अशी चिन्ह आहेत. शिंदे गट, काँग्रेसला नाशिक लोकसभेच्या सत्तास्थापनेसाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाशिकमध्ये आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला यंदा नाशिकमध्ये फायदा होणार, असे बोलले जात आहे. तर एमआयएम पक्ष नाशिकमध्ये किती उमेदवार देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नाशिक जिल्ह्यातील आमदार : 15  (Nashik MLA List)

1) नाशिक पूर्व विधानसभा -  राहुल ढिकले (भाजप) (Rahul Dhikle)

2) नाशिक मध्य विधानसभा -  देवयानी फरांदे (भाजप) (Devyani Pharande)

3) नाशिक पश्चिम विधानसभा -  सीमा हिरे (भाजप) (Sima Hire)

4) देवळाली विधानसभा -  सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट) (Saroj Ahire)

5) नांदगाव विधानसभा -  सुहास कांदे (शिवसेना - शिंदे गट) (Suhas Kande)

6) मालेगाव मध्य विधानसभा - मोहम्मद इस्माईल (MIM) (Mohammad Ismail)

7) मालेगाव बाह्य विधानसभा - दादा भुसे (शिवसेना - शिंदे गट) (Dada Bhuse)

8) बागलाण विधानसभा - दिलीप बोरसे (भाजप) (Dilip Borse) 

9) कळवण विधानसभा - नितीन पवार (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Nitin Pawar)

10) चांदवड विधानसभा - राहुल आहेर (भाजप) (Rahul Aher)

11) येवला विधानसभा - छगन भुजबळ (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Chhagan Bhujbal)

12) सिन्नर विधानसभा - माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Manikrao Kokate)

13) निफाड विधानसभा - दिलीप बनकर (राष्ट्रवादी - अजित पवार गट) (Dilip Bankar)

14) दिंडोरी विधानसभा - नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी- अजित पवार गट) (Narhari Zirwal)

15) इगतपुरी विधानसभा - हिरामण खोसकर (काँग्रेस) (Hiraman Khoskar)

आणखी वाचा

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Congress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीलाDhangar Reservation : एसटी आरक्षणात धनगर समाज समावेशाबाबत स्थापन समितीची बैठकBharat Gogawale ST  President : भरत गोगवले यांची एसटी महामंडळाच्या अधयक्षपदी वर्णी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget