Nashik Crime : 'पन्नास लाखांची लॉटरी लागलीय', नाशिकमध्ये टास्क फ्रॉड देऊन लुटीचा प्रकार सुरूच, सात लाखांची फसवणूक
Nashik Cyber Crime : नाशिकमधील एका तरुणाला पन्नास करोडची लॉटरी लागल्याची बतावणी करुन सात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक : डेबिट-क्रेडिट (Debit Card) कार्ड डिटेल्स, ओटीपी आणि इतर वैयक्तिक माहिती खात्री केल्याशिवाय कोणालाही शेअर करु नका असं आवाहन वारंवार सायबर पोलिसांकडून (Cyber Police) नागरिकांना केलं जातं असताना देखील सायबर फसवणुकीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. नाशिकमधील एका तरुणाला पन्नास करोडची लॉटरी लागल्याची बतावणी करुन सात लाख (Cyber Fraud) रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायबर गुन्हेगार (Cyber Crime) अशाप्रकारे काहींना काही अनोखी शक्कल लढवत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अगदी सहजरित्या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. नाशिक (Nashik) शहरातील सडिको भागात असा प्रकार समोर आला आहे. राहुल मुरलीधर मंडलिक या तरूणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या फेब्रवारी महिन्यात भामट्यांनी मंडलिक यांच्याशी संपर्क साधला होता. पन्नास करोड रूपयांची लॉटरी लागल्याची आमिष दाखवत भामट्यांनी मंडलिक यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेळोवेळी संपर्क साधत भामट्यांनी वेगवेगळी शुल्क आकरणीच्या बहाण्याने मंडलिक यांना टेलिग्राम, स्टेट बँक, कॅनरा बॅक, येस बँकेच्या खात्यात, तसेच काही मोबाईल नंबरवर गुगल पे द्वारे पैसे भरण्यास भाग पाडले.
गेल्या चार महिन्यात 7 लाख 7 हजार 594 रूपयांची रोकड भरूनही लॉटरीची रक्कम बँक खात्यात जमा न झाल्याने मंडलिक यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, टेलिग्रामवरुन (Telegram) कधी यू ट्यूब व्हिडीओ (Youtube Video) लाईक करण्याचा टास्क दिला जातो, तर कधी नागरिकांना सोपे वाटेल असे काम दिले जाते आणि त्या माध्यमातून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जाते. महिनाभरातच एकट्या नाशिक शहरात अनेक सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे सायबर पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून अशी होते फसवणूक
टास्क सायबर फ्रॉड.. (Task Cyber Fraud) सध्या हा फ्रॉड ट्रेंडिंगला असून नाशिक सायबर (Maharashtra Cyber Police) पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून टास्क सायबर फ्रॉड केला जात आहे. 'तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्याची मोठी संधी आहे, किंवा कमी वेळात अधिक नफा मिळवा असे मेसेजेस टेलिग्रामवर अनोळखी नंबरवरुन प्राप्त होतात, त्या मेसेजला रिप्लाय देताच कंपनीची पूर्ण प्रोफाईल सांगितली जाते. तसेच आजपर्यंत किती लोकांनी असे पैसे कमवले आहेत. त्याची माहिती दिली जाऊन नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो. आपण काम करण्याची तयारी दर्शवताच एक टास्क म्हणजेच काम दिले जाते आणि काम करण्यास सुरुवात करताच आपण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतो.
इतर महत्वाची बातमी :