एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik News : ड्रग्ज प्रकरण, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी, नाशिकमध्ये ठाकरे गटाचा विराट मोर्चा, 'असा' असेल मार्ग 

Nashik News : नाशिकच्या ड्रग्ज रॅकेट विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील ड्रग्स प्रकरण चांगले चर्चेत आले आहे. ड्रग्ज प्रकरण, अंमली पदार्थ तस्करी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था आणि बेरोजगारी या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे. खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या मोर्चा निघणार असून पदाधिकाऱ्यांनी जय्यत तयारी करण्यात आली आहेत. 

नाशिकजवळील (Nashik) शिंदे गावातील (Shinde Village) अमली पदार्थ प्रकरण राज्यभर गाजत असून धार्मिक नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकची ओळख आता गुन्हेगारीसही घेऊ लागली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून शिंदे गावात ड्रग्ज निर्मिती केली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकसह राज्यभरात हे ड्रग्ज पोहचवले जात होते. यातील मुख्य संशयित ललित पाटील (Lalit Patil) हाच यामागील सूत्रधार असल्याचे देखील उघडकीस येत आहे. तो एका गुन्हयांखाली तुरुंगात होता. मात्र आजारपणाचे कारण सांगून मागील काही महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. विशेष म्हणजे येथूनच तो ड्रग्जचे व्यवहार देखील करत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. त्यातच त्याने ससून रुग्णालयात पळ काढता नाशिकला मुक्कामही केला. त्यामुळे हे सर्व सुरु असताना नाशिकमधील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे सांगता येईल. आणि याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी संजय राऊत हे नाशिकला (Nashik drug Case) आले असता त्यांनी पोलीस, लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचा सहभाग असल्याशिवाय हे राजरोसपणे चालू राहू शकत नाही असा आरोप केला होता. त्यामुळे ठाकरे गट यावर आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अखेर आज हा मोर्चा निघणार आहे. शालिमार येथील ठाकरे गटाच्या कार्यालयापासून निघणार असून मध्यवर्ती भागातून हा मोर्चा रविवार कारंजा, रेड क्रॉस सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल, असे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले. नाशिक शहरात ड्रग्ज रॅकेट विरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली 11 वजाता मोर्चाला सुरुवात होणार आहे. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नाशिक काँग्रेसने देखील रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. त्यानंतर आज ठाकरे गट रस्त्यावर उतरणार असल्याने इतर पक्ष सहभागी होतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

... तर प्रशासकीय कारवाई करणार

ड्रग्ज माफिया ललित पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांनी नाशिक शहरात ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याचं पोलीस तपासत उघडकीस आले. मुबंई, पुणे पोलीस नाशिकमधे येऊन कारवाई करत असताना नाशिक पोलीसांना त्याची माहीती नसल्यानं पोलिसांची निष्क्रियता बाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाकरे गटाच्या आजच्या ड्रग्ज विरोधी मोर्चात विद्यार्थी सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घ्या, नाहीतर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असा मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना इशारा देण्यात आला आहे.  नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रक काढले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना निर्देश दिले आहेत.  विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात येऊ नये अशा आशयाचे एमआयएम पक्षाकडून प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्याच निवेदनाची  दखल घेण्यात आली आहे. 

ठाकरेंच्या मोर्च्यात विद्यार्थी सहभागी झाले तर प्रशासकीय कारवाई करणार, नाशिकच्या शिक्षण विभागाचा फतवा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 24 NOV 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Embed widget