Nashik News : "सांगा शेतकऱ्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा"; कांदा प्रश्नावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय, कोण काय म्हणाले?
Nashik Onion Issue : कांदा प्रश्नावरून (Onion Issue) राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.
नाशिक : कांदा प्रश्नावरून (Onion Issue) राज्य आणि केंद्र सरकारमध्ये असमन्वय आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. कारण निर्यात शुल्कामुळे कांद्याचे दर पडायला सुरुवात झालेली आहे, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेला आहे. तर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा, असून स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिली आहे.
केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Export Duty) वाढवून तब्बल 40 टक्क्यांवर नेल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे आणि त्यामुळे पुढील काळामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आणि निषेधार्थ आजपासून नाशिक (Nashik District) जिल्ह्यातील 15 बाजार समितीच्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहे. अशातच या निर्णयाबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या असमन्वय असल्याचे दिसून आले आहे.
एकीकडे मंत्री छगन भुजबळ म्हणतात की, निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान आहे तर केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणतात की, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असून स्पर्धा निर्माण झाली तरच शेतकऱ्यांचा फायदा असल्याचे वक्तव्य केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
डॉ. भारती पवार नेमकं काय म्हणाल्या?
कांद्याची इतर राज्यात मागणी वाढली आहे. निर्यात खुली आहे. पण काही प्रमाणात कर लावला आहे. आयात करण्याची वेळ न येता, आपल्याच देशात कांदा दिला तर, गैर काय? असा प्रश्न उपस्थित करत नाफेडला 2 लाख मेट्रिक टन कांदा आणखी खरेदी करण्याचे आदेश दिले. कारण ग्राहकाला देखील कांदा उपलब्ध झाला पाहिजे. निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांद्याचे दर पडणार नाही, किंवा यामागे निवडणुका हा हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मागणी आणि पुरवठा बघायला हवा, अशातच कांदा महाग झाला, असं राजकारण केलं जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढते. पण कांदा दर कमी होणार नाही. या संदर्भात पियूष गोयल यांना मागणी करणार आहे, पत्र लिहिणार आहे. या सर्व तारखा निश्चित झालेल्या असतात, सर्व प्रक्रिया होईल. विरोधक चुकीच्या पद्धतीने भडकवत आहे. बाजार समिती लिलाव बंद मागे घेण्याचे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले?
केंद्र सरकारने निर्यात शुल्क वाढविल्यामुळे अनेक भागातून शेतकरी आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मोठा कर लावल्याने निर्यातीवर परिणाम होणार असून कधी कांद्याचे भाव वाढतात, कधी एकदम शून्य होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान साहजिक आहे. मी लासलगावच्या लोकांना मुख्यमंत्री यांच्याशी भेट घालून देणार आहे. पवार साहेब आणि इतर पक्षाचे नेते यांनाही भेटणार असून या प्रश्नावर काही तोडगा निघतो का, याचा प्रयत्न करू असे सांगत कृषी उत्पादनावर पवार यांची अधिकार असून त्यांचे सहकार्य घ्यायला आम्ही तयार आहोत. सर्वांनी जाऊन काही होत असेल, तर आम्ही निश्चित प्रयत्न करू असेही भुजबळ म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chhagan Bhujbal VS Bharati Pawar: कांदा प्रश्नावर केंद्र - राज्यात असमन्वय?