एक्स्प्लोर

Nashik News : वय अवघे 22 वर्ष, सिन्नरचा सिद्धिविनायक महाराज म्हणून युट्युबवर प्रसिद्ध, मात्र मोलकरणीसोबत केला भलताच कांड!

Nashik News : अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल करणाऱ्या स्वयंघोषित महाराजास सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. 

नाशिक : आजकाल भोंदूबाबा बुवांचे लोण सर्वत्र पसरले असून यातून अनेकदा फसवणुकीचे प्रकार केले जातात. सोशल मीडियाचा (Social Media) आधार घेऊन फोटो मॉर्फ करून फसवणुकीचे (Fraud) प्रकार सर्रास घडत आहेत. असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. मोलकरीण म्हणून घरी येणाऱ्या महिलेचे मॉर्फिंग करत त्याचा वापर करून अश्लील व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या स्वयंघोषित महाराजास सिन्नर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. 

संगमनेर (Sangamner) येथील रहिवाशी असलेल्या राहुल घुले हा सिन्नरमधील (Sinner) नायगाव रोड भागातील एका शिक्षकाच्या घरात भाडेकरारावर वास्तव्यास होता. तेथून तो बुवाबाजीच्या नावाखाली लोकांची आर्थिक लूट करत होता. त्याच्याकडे उद्योग भवन परिसरातील 33 वर्षीय महिला मोलकरीण म्हणून कामाला येत होती. या महिलेचा चेहरा मार्फिंग करत राहुल घुले याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवले. महिलेच्या नावाने इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फेक अकाउंट उघडून व्हिडिओ त्यावर अपलोड केले. याशिवाय तिच्या नातलगांनाही पाठवले. ही बाब महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर या भोंदूबाबाच्या विरोधात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून 26 ऑक्टोबरला सिन्नर पोलिस ठाण्यात (Sinner Police) माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

दरम्यान या तरुणाने मोलकरीण म्हणून येत असलेल्या महिलेस भूलथापा देऊन तिचा अश्लिल व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर सदर व्हिडीओ संबंधित महिलेच्या पतीच्या व्हॉटसअॅपला (WhatsApp) टाकला. त्याचबरोबर संबंधित महिलेच्या नातेवाईकांना देखील पाठविण्यात आला होता. यानंतर पीडित महिलेने सिन्नर पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वीच भोंदूबाबा सिन्नरमधून गायब होता. पोलिसांनी नागपूर, मुंबई, पुणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी लोकेशन ट्रॅक करत या बाबाचा माग काढला. मात्र, तो वारंवार लोकेशन बदलत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रविवारी तो संगमनेरला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. 

सिध्दीविनायक बाबा नावाने युट्युब चॅनल

दरम्यान अश्लील व्हिडीओ असलेला त्या मोबाईल पोलिसांनी शिर्डी येथून एका लॉजमधून ताब्यात घेतला. मोबाईलची तपासणी केली असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. युट्युबवर सिद्धिविनायक महाराज नावाने त्याचे अकाउंट असल्याचे समोर आले. काही महिन्यांपूर्वी याच सिद्धिविनायक महाराज उर्फ राहुल घुले याने सिन्नर शहरात नायगाव रोड परिसरात राहत असलेल्या एकाची दुचाकी पाच ते दहा मिनिटांसाठी घेतली होती, ती परत दिलीच नाही. नंतर पोलीस तपासात ती दुचाकी नागपूर (Nagpur) असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कसून शोध घेत राहुल घुले यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 


इतर महत्वाची बातमी : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदे साहेब मुख्यमंंत्री नको, हे म्हणणारे पहिले नेते अजित पवार,तटकरे : राऊतABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
Embed widget