Nashik leopard : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, रेस्क्यू करताना पशुवैद्यकीय डॉक्टरवर बिबट्याचा हल्ला
Nashik News : सिन्नर तालुक्यात बिबट्याला रेस्क्यू (Leopard Rescue) करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टिमवरच बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.
![Nashik leopard : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, रेस्क्यू करताना पशुवैद्यकीय डॉक्टरवर बिबट्याचा हल्ला Nashik Latest News Veterinary doctor attacked by leopard during rescue in Sinnar maharashtra news Nashik leopard : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार, रेस्क्यू करताना पशुवैद्यकीय डॉक्टरवर बिबट्याचा हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/02/514932a0f655d53a6cb31177e9a618a71696233972411738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यात सातत्याने बिबट हल्ल्याच्या (Leopard Attack) घटना घडत असून वनविभागाकडून संबंधित परिसरात पिंजरा लावण्यात येत आहे. काही ठिकाणी बिबटे रेस्क्यू होत आहेत. दरम्यान तालुक्यातील खंबाळे येथे बिबट्याला रेस्क्यू (Leopard Rescue) करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टिमवरच बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. टीममधील पशु वैद्यकीय डॉक्टरवरच हल्ला करून बिबट्याने पळ काढला. वनविभागाकडून परिसरात वनकर्मचाऱ्यांच्या पथकांसह पिंजरा तैनात करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिन्नर (Sinner) तालुक्यातील विविध भागात बिबट्याच्या दर्शनाबरोबरच हल्ले होत आहेत. त्यामुळे येथील वनविभाग प्रशासन सातत्याने परिसरात बिबट अधिवास क्षेत्रात रेस्क्यू करण्यासाठी तळ ठोकून आहे. तालुक्यातील खंबाळे गाव शिवारात बिबट्या आल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. यानंतर तातडीने सिन्नर वनविभागाची (sinner Forest) रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. यावेळी रेस्क्यू करत असताना पशुवैद्यकीय डॉक्टरवर बिबट्याने हल्ला करत पळ काढला. या घटनेत त्यांच्या पायावर जखम झाली. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. यावेळी अंधार पडल्यामुळे बिबट्याला रेस्क्यू करणे कठीण होते. नंतर दुसऱ्या दिवशी शोध घेतला असता बाबत वन्यप्राणी जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे वनविभाकडून सांगण्यात आले आहे.
खंबाळे गावात बिबट्या संचार करीत असल्याची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळाली होती. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्यासह वन विभागाचे पथक मानव वन्यजीव संरक्षक व पशुवैद्यक टीम खंबाळे येथे दुपारी चार वाजेच्या सुमारास गेले होते. खंबाळे माळवाडी रस्त्यावर खाडे वस्तीजवळ बिबट्या मोकळ्या जागेतील उंच गिंनी गवतात दबा धरून बसला होता. विभागाचे पथक बिबट्याला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत असताना बिबट्याने पशुवैद्यावर हल्ला केला. पशुवैद्यक डॉक्टर यात जखमी झाले. प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमी पशुवैद्यकांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आल्याचे समजते. शनिवारी अंधार पडेपर्यंत बिबट्याचा शोध घेण्यात आला. उशीर झाल्याने शोध कार्यात अडथळा आला. नंतर दुसऱ्या दिवशी रविवारी खंबाळे शिवारात बिबट्याचा शोध घेण्यात आला. तथापि, बिबट्या आढळून आला नाही.
पिंजरा लावत असतानाच बिबट्याची झडप
निफाड तालुक्यातील विंचूर व परिसरात मुक्त संचार असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याच्या तयारीत असलेल्या शेतकरी व वन विभाग कर्मचाऱ्यांच्या अंगावरच बिबट्या धावून गेल्याची घटना घडली. बिबट्याने काही क्षणातच धूम ठोकल्याने संबंधितांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी 'स्पॉट' शोधण्याची तयारी सुरू असताना बिबट्या शेतकरी व वनकर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता दोन बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतात लहान आणि मोठ्या बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वन विभागाच्या पथकाने या भागात पिंजरा लावला आहे. नागरिक बिबट्या कधी जेरबंद होतो, याच्या प्रतीक्षेत आहेत.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)