Zero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha
Zero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP Majha
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला (Mahayuti) राज्यात घवघवीत यश मिळालं असून 288 मतदारसंघांतील निवडणुकांपैकी तब्बल 237 जागांवर भाजप महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे, महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन चांगलच रणकंदन माजलं आहे. त्यातच, मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याचा निर्णय दिल्लीत झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) नाराज झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवगिरी बंगल्यातून सुरक्षेशिवाय बाहेर पडल्याचे समजते. एकीकडे राज्यात मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं राजकारण व घडामोडी घडत असताना अजित पवार हे अचानक दिल्लीला गेल्याची चर्चाही मुंबईतील त्यांच्या बंगल्याबाहेर सुरू आहे. राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन रणकंदन पाहायला मिळत आहे. महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आमदार हे आपल्या नेत्यांसाठी देव पाण्यात ठेऊन आहेत. राष्ट्रवादीचे आमदार हे अजित पवारांच्या नावाचा जप करत आहेत. तर, एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा शिवसेना आमदार करत आहेत. भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांचे बॅनर झळकावत अगोदर त्यांना मुख्यमंत्री बनवलं आहे. मात्र, दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून कोणाचं नाव समोर येतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. कारण, मुख्यमंत्री पदाबाबत दे धक्का हा भाजपचा इतिहास यापूर्वी अनेकांनी पाहिला आहे. त्यामुळे, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री कोण मिळेल, की देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/abf677489e884d45200e9bcd35f6be961739728323289718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas Dhananjay Munde Meets|सुरेश धस, धनंजय मुंडेंच्या भेटीचा बोभाटा कुणी केला? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/e9a5dbcbff647f2dfa676a814f5d8c251739728044425718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis And Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो मान्य : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/359be9e43612143aff2df70942a447501739720791953718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)