एक्स्प्लोर

Nashik Bribe : नाशिक जिल्ह्यात लाचखोरीचा कळस, सहाय्यक पोलीस निरीक्षकांने 50 हजार मागितले, एसीबीकडून अटक 

Nashik News : येवला पोलिस स्टेशनच्या एपीआय आणि पोलीस शिपायास लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात (Nashik District) लाचखोरीने कळस गाठला असून दिवसाआड एसीबीच्या (ACB) पथकाकडून अधिकारी, कर्मचारी यांना अटक केली जात आहे. असं असताना देखील लाच घेताना इतर कचरताना दिसत नाही. अशातच एसीबीच्या जाळ्यात नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना  अडकले आहेत. त्यामुळे नाशिक ग्रामीण (Nashik Rural Police) पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. 

महसूल आरोग्य, शिक्षण त्याचबरोबर पोलीस प्रशासन (Nashik Police) देखील लाचखोरीच्या (Bribe) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शासनाकडून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अनेक विभागांमध्ये लाचखोरी सुरु असल्याचे अशा कारवायांमधून अधोरेखित झाले आहेत. अशातच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असलेल्या पोलीस प्रशासनातही लाचखोरीची कीड बळावत चालली आहे. याच ताज उदाहरण म्हणजे येवला पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. त्याचबरोबर सोबतच्या पोलीस शिपायाला देखील या प्रकरणी ताब्यात घेतेले आहे. 

दरम्यान येवला शहर पोलीस स्टेशन (Yeola Police) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून येवला शहर पोलीस स्टेशन येथे नव्याने दाखल झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व एक पोलीस कॉन्स्टेबल हे 50 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात जाळ्यात सापडले आहे. तक्रारदार याच्या भावावर दाखल गुन्ह्यात आणखी कलमे वाढवू नये ,यासाठी ही लाच मागितल्याचे बोलले जात आहे. या घटनेने संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे आणि पोलिस शिपाई सतिश बागुल अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत.

50 हजार रुपये लाचेची मागणी

संशयित लाचखोर पोलीस दोघेही येवला शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. येवला शहर पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल होता. तक्रारदाराचा भाऊ अटकेत असून, लाचेची मागणी सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे व पोलिस नाईक सतीश बागुल यांनी केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीमध्ये मारहाण करणार नाही, तसेच सदर गुन्ह्यात 307 वाढीव कलम लावण्याची भीती घालून लाचखोर सपकाळे आणि बागुल यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाचखोर सपकाळेने गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांचा मोबाईल हिसकावला. तसेच त्यातील मोबाईल डिटेल्स हिस्ट्री डिलीट केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर? 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget