Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर?
Nashik Bribe List : महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचाराची (Maharashtra Bribe) कीड काही केल्या संपत नाही. यात नाशिक विभाग लाचखोरीत नंबर एकवर आहे.
Nashik Bribe List : महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचाराची (Maharashtra Bribe) कीड काही केल्या संपत नाही. यावर्षीची भ्रष्टाचाराची आकडेवारी पाहिली तर नाशिक विभाग लाचखोरीत नंबर एकवर आहे. दोनच दिवसांपूर्वी तहसीलदार नरेशकुमार बहिरम एसीबीच्या जाळ्यात अडकला. अशा अनेक कारवाई आहेत, ज्यात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. नाशिक विभागातील ही यादी भलीमोठी असली तरीही काही अधिकाऱ्यांनी लाचखोरीची हद्दच पार केल्याचे दिसून आले.
तत्कालीन मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar) यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती. एका निलंबित मुख्याध्यापकाला कामावर पुन्हा रुजू करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी सुनीता धनगर यांच्यासह नितीन जोशी या दोघांनी एकूण 55 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. शिक्षणाधिकारी धनगर या 50 हजार रुपये आणि लिपिक जोशी हे 5 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने ताब्यात घेतले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर (Vaishali Zankar) यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरीता राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज रमे दशपुते यांनी वैशाली झनकर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली. तडजोडीअंती 8 लाख रुपये मान्य करत शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फ़त ही लाच त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतानाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले.
नाशिक तालुका तहसीलदार नरेशकुमार बहिरम (nareshkumar Bahiram) यांना नुकतीच 15 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. राजूर बहुला येथील एकाच्या जमिनीत मुरूम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाच पट दंड आणि स्वामित्वधन जागाभाडे मिळून एक कोटी 25 लाख सहा हजार 220 रुपये दंड आकारणीचे आदेश संशयित बहिरमला जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्या आदेशाविरुद्ध जमीनमालकाने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले. त्यावरून फेरचौकशीसाठी बहिरमकडे हे प्रकरण पाठविण्यात आले. त्यानंतर स्थळ निरक्षणासाठी मालकाला बोलवण्यात आल्यानंतर लाचेची मागणी करण्यात येऊन 15 लाखांची लाच स्वीकारताना बहिरम यांना अटक करण्यात आली आहे.
दिनेशकुमार बागुल (Dineshkumar Bagul) हे नाशिकच्या आदिवासी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत होते. या विभागात कार्यकारी अभियंता असताना नाशिकच्या त्र्यंबक तालुक्यातील हरसुल मधील मुला मुलींच्या वस्तीगृहातील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी अडीच कोटींचा निधी यासाठी वापरण्यात येणार होता. यासाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रतीची मागणी तसेच कार्यारंभ आदेश देण्याकरता आर के इन्फ्रा कॉन्ट्रो नावाच्या कंपनीतील तक्रारदाराकडून 12 टक्के दराने मोबदला मागितला. त्यानंतर 28 लाख 80 हजार रुपयांची रक्कम बागुल यांनी राहत्या घरी स्वीकारली.
सतीश खरे (Satish Khare) हे सहकार विभागात जिल्हा निबंधक म्हणून कार्यरत होते. नाशिक जिल्ह्यातील एका बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल 30 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.
महेशकुमार शिंदे (Maheshkumar Shinde) हे भूमी अभिलेख कार्यालयात नाशिक (Nashik) जिल्हा अधीक्षक म्हणून कार्यरत असताना 50 हजारांची लाच घेताना अटक झाली. तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीच्या नमुना बारामध्ये शासकीय नोंद चुकली आहे. त्यात दुरुस्तीसाठी लिपिकासह जिल्हा तथा उत्तर महाराष्ट्रप्रमुखांनीच एक लाख ऐंशी हजारांची लाच मागून तडजोडीअंती एक लाख रुपये मंगळवारी रात्री घेण्याचे ठरले. भूमी अभिलेख कार्यालयातच मागणीपैकी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली.
महेश पाटील (Mahesh Patil) हे सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार (Nandurbar) येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना साडे तीन लाखांची लाच स्वीकारली. तक्रारदराने पूर्ण केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वेळोवेळी 10 टक्के आणि तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी 0.75 टक्के ते 1 अशा टक्केवारीच्या स्वरुपात एकत्रित 43 लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली. अखेर या प्रकरणी संबंधित ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मागणी केलेल्या लाचेच्या रक्कमेपैकी 3 लाख 50 हजार रुपये अशी रक्कम लाचखोर महेश पाटील यांना त्यांच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी स्वीकारली.
अमर खोंडे (Amar Khonde) हे धुळे येथील (Dhule) महावितरण विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना दोन लाखांची लाच स्वीकारली. तक्रारदाराने दोंडाईचा विभाग, धुळे विभाग, धुळे ग्रामीण विभागात उद्दिष्टाप्रमाणे वेळेत शंभर टक्के काम पूर्ण केले. त्याचे कामाचे बिल 56 लाख 31 हजार 590 रुपये झाले. ही रक्कम मंजुरीसाठी ठेकेदाराने वीज कंपनीच्या येथील कार्यालयाकडे प्रस्तावाद्वारे सादर केली. बिल मंजुरीसाठी तक्रारदाराने संबंधित कार्यालयात तगादा लावला. व्यवस्थापक अमर खोंडे व उपव्यवस्थापक मनोज पगार यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती अडीच लाखांची रक्कम निश्चित झाली. पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना संशयित खोंडे व पगार याला पकडण्यात आले.
विजय बोरुडे (Vivek Borude) हे कोपरगावचे तहसीलदार (Tahsildar)असताना वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. तक्रारदारावर कोणतीही केस न करता पकडलेला वाळूचा डंपर सोडून देण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम त्यांचा पण तर गुरमीत सिंग दडियाल याच्याकडे देण्यात सांगितले. होते. लाच प्रतिबंधक पथकाने वीस हजार रुपये स्वीकारताना गुरमीत सिंग याला रंगेहाथ पकडण्यात आले.
विठ्ठल मच्छिन्द्र काकडे (Vitthal Kakde) हे पारनेर तहसील कार्यालय पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना लाच स्वीकारली. तक्रारदार हे पारनेर यादववाडीयेथील जय जवान बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानावर सेल्समन म्हणून 2020 पासून काम करत आहेत. त्यांनी मागील तीन महिन्यापासून तालुक्यातील वाडेगव्हान येथील लाभार्थ्यांना ते काम करत असलेल्या स्वतः धान्य दुकानातून धान्य वाटप केले म्हणून त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी यातील काकडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार लाचेली मागणी केली बाबतची तक्रार ला.प्र.वि. अहमदनगरकडे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या :