Nashik News : महाराष्ट्रात नाशिक अव्वल तरीही लाचखोरी सुरुच, 10 हजारांची लाच घेताना लेखा अधिकाऱ्यास अटक
Nashik News : नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील लेखा अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच (Bribe) घेताना अटक केली आहे.
नाशिक : नाशिकसह (Nashik) विभागात लाचखोरी सुरुच असून जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील विशेष लेखापरीक्षकाला (Special Auditor) लाच लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आल्यानंतर नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील लेखा अधिकाऱ्यास 10 हजारांची लाच (Bribe) घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.
सततच्या लाचखोरीमुळे प्रत्येक शासन विभाग भ्रष्टाचाऱ्याचा गर्तेत सापडल्याची चिन्हे आहेत. असा कोणताच विभाग नाही, ज्या विभागातून लाचखोर पकडले जात नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा असा प्रश्न उपस्थित होत. कारण रोजच्या रोज कुठेतरी लाच घेताना अधिकारी पकडले जात आहेत. आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील आंबोली येथील (Amboli School) वसतिगृहाच्या इमारतीचे 4 लाख 59 हजार 258 रुपयांचे थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यांच्याकडे पाठवण्यासाठी लेखा अधिकारी भास्कर रानोजी जेजुरकर यांना 10 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
तक्रारदार यांच्या वडिलांच्या मालकीच्या इमारती आंबोली येथील दोन वसतिगृहांसाठी 2021 ते 2024 या भाडे कराराने दिलेल्या आहेत. इमारत क्रमांक 422/1 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे दोन लाख 93 हजार 994 रुपये तसेच इमारत क्रमांक 422/2 चे एप्रिल ते जून 2023 पर्यंतचे घरभाडे 1 लाख 656 हजार 264 रुपये असे एकूण चार लाख 59 हजार 258 रुपये थकीत घरभाड्याची बिले प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवण्यापूर्वी लेखा अधिकारी, भास्कर रानोजी जेजुरकर यांच्याकडे प्रलंबित होते. बिलांची पडताळणी करुन मंजुरीकरता सादर करण्यासाठी भास्कर जेजुरकर यांनी तक्रारदाराकडे 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना भास्कर जेजूरकर यांना शुक्रवारी रंगेहाथ पकडण्यात आले. एसीबीकडून संबंधित लेखा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी अधिकारी आणि कर्मचारी निर्ढावलेले?
लाचखोरीत नाशिक सध्या महाराष्ट्रात अव्वल आलेलं असतानाही लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीत. रोज कुणी ना कुणी लाच घेताना सापडत आहेत, त्यांच्यावर कारवाईही होत आहे. पण तरीही सरकारी अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत, हेच यातून दिसून येत आहे. चालू वर्षी एकट्या नाशिक परिक्षेत्राचाच विचार केला तर नाशिक विभाग लाचखोरीत नंबर एकवर आहे. दर दोन तीन दिवसाआड एसीबीच्या जाळ्यात कोणी ना कोणी अडकत असूनही लाचखोरीच्या घटना काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याने सरकारी अधिकारी आणि कर्मचारी किती निर्ढावलेले आहेत हेच यातून बघायला मिळत आहे.
इतर महत्वाची बातमी :