एक्स्प्लोर

Nashik Rohit Pawar : 'तो' दोन वर्षांपासून फरार, सरकारमधील एखादा नेताच पेपरफुटीमागे आहे का? आमदार रोहित पवारांचा सवाल

Nashik News : सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे सरकारमधील एखादा नेताच या पेपरफुटीमागे आहे का? अशी शंका रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी उपस्थित केली. 

नाशिक : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तलाठी परीक्षेतील (Talathi Copy Case) गैरप्रकाराच्या सखोल तपासासाठी नाशिक पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. या घटनेनंतर खर तर अनेक प्रश्न उपस्थित होत असतांनाच यावरून राजकारणही चांगलंच तापलं असून सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे सरकारमधील एखादा नेताच या पेपरफुटीमागे आहे का? अशी शंका राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) यांनी उपस्थित केली आहे. 

नाशिकमध्ये (Nashik) समोर आलेल्या तलाठी परिक्षेतील गैरप्रकारानंतर (Talathi Bharati 2023) राज्यभरात खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाच्या खोलवर जाऊन नाशिक पोलीस तपास करणार का? असाच प्रश्न लाखो परीक्षार्थी उपस्थित करत असतानाच आता नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तांनी (Nashik Police) एक स्वतंत्र पथकच तयार केले असून या पथकात एसीपी, चार वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी अशा एकूण 10 जणांचा समावेश आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आणि सध्या नाशिकच्या म्हसरूळ पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपी गणेश गुसींगेच्या छत्रपती संभाजीनगर मधील गावी जाऊन हे पथक तपास करण्याची शक्यता आहे. गणेश गुसिंगेचे अजून कोण कोण साथीदार आहेत? हे रॅकेटच कार्यरत आहे का? गैरप्रकार करणारे छत्रपती संभाजीनगरमधिलच असल्याचं का समोर येते? ही नक्की लिंक काय? आधुनिक साहित्य वापरत हायटेक कॉपीचे प्रशिक्षण दिले जाते का? यांसह ईतर गोष्टींचा पथकाकडून सखोल तपास केला जाणार आहे. 

आरोपी गणेश नुसिंगेकडे (Ganesh Nusinge) सापडलेल्या वॉकी टॉकीमुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून अशाप्रकारे हायटेक कॉपी (Hightech Copy) करणारी एक टोळीच कार्यरत असण्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. वॉकीटॉकी हे एक असे यंत्र आहे, जे कोणतीही वायर किंवा इंटरनेट शिवाय काम करते. वॉकी टॉकीच्या क्षमतेनूसार साधारणपणे 3 किलोमीटरपर्यंत एकमेकांशी संपर्क साधता येतो आणि हेच यंत्र तलाठी परीक्षेदरम्यान गणेशकडे सापडल्याने वॉकी टॉकीच्या सहाय्याने तो शहरात ईतरांशी देखील संपर्कात असावा का? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. अशीही शक्यता वर्तवली जाते आहे की एका मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचे फोटो बघितले जात असावे तर श्रवणयंत्र जोडलेल्या दुसऱ्या मोबाईलवरून किंवा टॅबवरून उत्तर दिली जात असावी आणि गणेश आपल्या ईतर साथीदारांशी बोलतांना वॉकी टॉकीचा वापर करत असावा. या घटनेनंतर खर तर अनेक प्रश्न उपस्थित होत असतांनाच यावरून राजकारणही चांगलंच तापलं असून सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीमुळे सरकारमधील एखादा नेताच या पेपरफुटीमागे आहे का? अशी शंका राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांनी यांनी उपस्थित केली आहे.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात

दरम्यान या प्रकारानंतर नाशिक शहरातील सर्व केंद्रावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुन्हा कुठला गैरप्रकार होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेतली जाते आहे. परीक्षार्थींचे ओळखपत्र तपासले जाऊन त्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जातो आहे. दरम्यान असे गैरप्रकार होऊ नये, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई सरकारने करावी अशी मागणी परीक्षार्थी करत आहेत. तसं बघितलं तर गणेश नुसिंगे हा दोन वर्षांपासून पिंपरी चिंचवड पोलिसांना पाहीजे असलेला आरोपी होता. जवळपास दोन वर्षे तो पोलिसांच्या हाती का लागला नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून नाशिक पोलीस तरी आता या प्रकरणाच्या खोलवर जाणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

इतर महत्वाची बातमी : 

Nashik Talathi : नाशिकच्या तलाठी परीक्षेत गैरप्रकार, हायटेक कॉपीसाठी प्रशिक्षण कुठून? चौकशीसाठी दहा जणांचं पथक नेमलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget