एक्स्प्लोर

Nashik Citylink Bus Strike : "कामावर हजर व्हा नाहीतर..."; संपावर गेलेल्या बस वाहकांना सिटीलिंक प्रशासनाचा इशारा

Nashik News : शहरात सलग दुसऱ्या दिवशी काही भागातील सिटी लिंक बस सेवा ठप्प आहे. त्यामुळे नाशिककरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकरोड डेपोतील बससेवा सुरळीत झाली आहे.  

Nashik News नाशिक : सिटी लिंक बससेवा (Nashik Citylink Bus Service) कालपासून पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. वाहकांचे तीन महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन (Workers Strike) पुकारले आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी काही भागातील सिटी लिंक बस सेवा ठप्प आहे. त्यामुळे नाशिककरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.  

सिटीलिंक बससेवा ऐन परिक्षांच्या काळात बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे. बस थांब्यावर प्रवाशी बसची वाट बघत उभे असल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्यादेखील वाहकांनी पगार रखडल्याने संप पुकारला होता. आता पुन्हा एकदा सिटीलिंकच्या वाहकांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे वाहकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

नाशिकरोड डेपोतील बससेवा सुरळीत

शहरातील तपोवन डेपोतील (Tapovan Depot) बस कर्मचाऱ्यांचे आजही आंदोलन सुरू आहे. तर नाशिकरोड डेपोतील (Nashikroad Depot) बससेवा सुरळीत झाली आहे. एका ठेकेदाराकडून पगार मिळत नसल्याने कर्मचारी संपावर गेले आहेत. तर दुसऱ्या ठेकेदाराकडून पगार होत असल्याने नाशिकरोड येथील बससेवा सुरळीत आहे. 

पगार मिळत नसल्याने कर्मचारी आक्रमक 

नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलन केली जात आहेत. पगार नाही, तर काम देखील नाही, अशी भूमिका घेत सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. अचानक काम बंद आंदोलन सुरु केल्याने नाशिक शहरातील बससेवा खंडित झाली आहे. 

सिटीलिंक व्यवस्थापन काय तोडगा काढणार? 

गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही.गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ देखील झालेली नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सिटीलिंक व्यवस्थापन यावर काय तोडगा काढणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

नोकरदार वर्गाचे हाल

तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून कालपासून एकही बस बाहेर पडलेली नाही. बस सेवा ठप्प झाल्याने प्रत्येकाच्या खिशाला भुर्दंड बसत आहे. परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थी ठिकठिकाणी बस थांब्यावर ताटकळत उभे असल्याचे दिसून येते. नोकरदार वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कामावर हजर व्हा नाहीतर निलंबित करू

आम्हाला तीन महिन्यांपासून वेतन नाही, आमचा वाली कोण ? असा सवाल संतप्त वाहकांनी प्रशासनाला केला आहे.  कामावर हजर व्हा नाहीतर निलंबित करू असा इशारा संपावर गेलेल्या बस वाहकांना सिटीलिंक प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : हातात चटणी भाकरी, अंगात ताप, तरीही 'दळवी बाबा' आंदोलनावर ठाम; शेतकऱ्यांच्या आंदोलनाची इनसाइड स्टोरी

Rahul Gandhi Visit Kalaram Temple : मोदींनंतर आता राहुल गांधीही काळाराम मंदिराला भेट देणार; असा असणार दौरा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget