(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : नाशिक पोलिसांचा वाळू माफियांना दणका, 72 लाखांचा मुद्देमाल जप्त
Nashik Crime : अवैध गौणखनिजाची वाहतूक करणार्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून जवळपास ७२ लाखांचा दंड वसूल केल्याने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : जिल्ह्यात अवैध गौणखनिजाच्या उत्खननाचे व वाहतुकीचे प्रमाण वाढले असून अवैध गौण खनिजाची तस्करी करणारे सक्रिय झाल्याचे दिसून येते. अशातच अवैध गौणखनिजाची वाहतूक करणार्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून जवळपास 72 लाखांचा दंड वसूल केल्याने वाळू माफियामध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात वाळू माफिया हातपाय पसरत आहे. या सर्व तस्करी करणाऱ्या माफियांवर कारवाईसाठी आता नाशिक ग्रामीण पोलीस सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सिन्नर एम.आय.डी.सी. व येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाळुची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या वाहनांवर छापे टाकुन कारवाई केली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सिन्नर व येवला परिसरात गौणखनिजाची अवैधरित्या वाहतुक व तस्करी होत असल्याबाबत माहिती मिळाली.
दरम्यान माहिती मिळालेवरून पोलीस पथकाने सिन्नर एम.आय. डी.सी.पोलीस ठाणे हद्दीत पंचाळे गावच्या शिवारात पंचाळे ते सिन्नर जाणारे रोडवर अवैधरित्या वाळुने भरून जाणाऱ्या ट्रकवर छापा टाकला. सदर छाप्यात वाळुने भरलेला ट्रक व ट्रकचालक गणेश शिवाजी नवले यास ताब्यात घेतले. या ट्रकचालकाच्या ताब्यातून 55 हजार 390 रुपयांची अवैध वाळु तसेच अशोक लेलंड कंपनीची ट्रक असा एकुण 15 लाख 55 हजार ३९० रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गाडीवरील तसेच येवला तालुका पोलीस ठाणे हद्दीत भरवस फाटा ते कोळपेवाडी जाणारे रोडवर अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक होत असल्याची माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी विश्वनाथ काकड व पोलीस हवालदार पाठक यांना माहिती दिल्यावरून त्यांच्या पोलीस पथकाने भरवस फाटा परिसरात अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे एकुण 03 हायवा ट्रक चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान या कारवाईत 04 हायवा ट्रक आणि अवैध वाळु असा एकूण 72 लाख 26 हजार 235 चा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे. चालक व मालक तसेच वाळुची तस्करी करणारे मालकांविरुद्ध अवैधरित्या गौणखनिज वाहतुक व साठवणुक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये विलास नागरे, देविदास निवृत्ती कानडे, ज्ञानेश्वर पुंजाहरी बुरूंगुले अशीताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.