Sharad Pawar : आपल्यासोबत कोण? शरद पवारांची नाशिकमधील नेत्यांशी वन टू वन चर्चा, लवकरच नव्या नियुक्त्या
Nashik NCP : शरद पवारांचा नाशिक जिल्ह्यावर फोकस असून मुंबईत बसून जिल्ह्यातील पक्ष बांधणीची आखणी केली जात आहे.

Nashik Politics : येवला (Yeola) येथील सभेनंतर शरद पवार (Nashik) हे पक्ष बांधणीवर भर देत असल्याचं समोर येत आहे. त्यानुसार त्यांनी नाशिक जिल्हयावर फोकस करण्याचे ठरविले आहे. मुंबईमध्ये राहून ते नाशिक जिल्ह्याची रणनीती आखत असल्याचे माहिती मिळते आहे. आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींना ते समोरासमोर बसवून चर्चा करत आहेत. त्यानंतर लवकरच नाशिक जिल्ह्यात नव्या नियुक्त्या करणार येणार असल्याचे समजते आहार.
राष्ट्रवादीच्या (Maharashtra NCP) फुटी नंतर शरद पवार यांची पहिली सभा येवल्यात पार पडली. या सभेत शरद पवार (Sharad Pawar) यांनी बंडखोरांना इशारा दिलेला होता की शरद पवार गटाचे पुढचे मार्गक्रमण कसे असणार आहे. तर या सभेला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते. मात्र त्यानंतर काही घडणार नाही, असं वाटत असतानाच नंतर शरद पवार यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी येवल्याच्या सभेत देखील शरद पवार गटात प्रवेश केला होता. येवला सभेनंतर शरद पवार गटासोबत मतदारसंघातील जुने जाणते लोक असल्याचे दिसून आले. याच लोकांना आता मुंबईमध्ये (Mumbai) बोलवून त्यांच्याशी वन-टू-वन चर्चा केली जात आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड यांच्यासोबत यांच्यासोबत राहून पक्षाची पुनर्बांधणी करा, असे आवाहन शरद पवारांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान कोणत्या तालुक्यातील किती पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजित पवारांसोबत गेले आहेत. याचा आढावा देखील शरद पवार घेत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात नाशिक जिल्ह्यात नव्या नियुक्त्या होण्याची माहिती देखील मिळते आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आणि त्यांची टीम सध्या तालुक्यातील शरद पवार गटातील नेत्यांचा आढावा घेत आहेत. नाशिकचे दुसरे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष हे अजित पवार गटासोबत आहेत. उरलेले जे काही पदाधिकारी आहेत. त्यांच्याकडून तालुक्यांचा आढावा घेऊन यादी बनवली जात असून त्यानुसार कोण कोण आपल्या सोबत आहे. यातून अनेकांच्या जिल्ह्यावर नियुक्त्या करण्यात येणार आहेत, अशा पद्धतीची रणनीती शरद पवार गटाकडून आखण्यात येत आहे.
अजित पवार गटाकडून लवकरच उत्तर सभा
दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांनी मैदानात उतरत येवला येथून बंडखोरांना उत्तरे देण्यास सुरवात केली. या सभेत शरद पवार अतिशय सौम्य पण कटू शब्दात बंडखोरांची खरडपट्टी काढली. यावर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा उलगडा केला. यावेळी त्यांना उत्तर सभा घेणार याबाबत प्रश्न विचारला असता लवकरच अजित पवार गटाकडून उत्तर सभा घेण्यात येईल, असे भुजबळांनी म्हटले आहे.
Chhagan Bhujbal : मी महापौर अन् आमदार झाल्यानंतर तुमचा जन्म, इतिहास जाणून घ्या; रोहित पवारांना भुजबळांचा सल्ला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
