एक्स्प्लोर
Maharashtra Politics: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार, अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस... सर्वाधिक श्रीमंत कोण?
Maharashtra Politics: राजकारणी आणि त्यांच्या संपत्तीचे अनेक किस्से आपण आतापर्यंत ऐकले आहेत. अनेक बॉलिवूड, टॉलिवूड चित्रपटांमध्ये आपण राजकाण्यांचे पैसे, मालमत्ता याबाबतचं चित्रणही पाहतो.
Maharashtra Politics
1/8

एवढंच काय तर, खऱ्या आयुष्यातही आपल्या मालमत्तेमुळे अनेक राजकाणी केंद्रीय यंत्रणांच्या कचाट्यात अडकल्याचं आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला या राजकाण्यांची खरी संपत्ती किती? हे माहीत आहे का?
2/8

जाणून घेऊयात, सध्या महाराष्ट्राच्या राजकाणात चर्चेत असलेले नेते आणि त्यांच्या मालमत्तांसंदर्भात...
3/8

अजित पवारांच्या बंडानंतर महाराष्ट्रात भूकंप झाला. अजित पवारांनी बंड करत थेट थोरल्या पवारांना आव्हान दिलं. पण तुम्हाला माहीत आहे का? अजित पवारांची संपत्ती अजित पवारांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.
4/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्याकडे एकूण 75.48 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
5/8

निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एकूण संपत्ती केवळ 32.73 कोटी रुपये आहे. यामध्ये जंगम आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश होतो.
6/8

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 11 कोटी 56 लाख 12 हजार रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
7/8

प्रतिज्ञापत्रानुसार, शिवसेना ठाकरे गटाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 143.26 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. यामध्ये जंगम आणि जंगम अशा दोन्ही मालमत्तांचा समावेश होतो.
8/8

दुसरीकडे, जर आपण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याबाबत बोललो, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 3.78 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Published at : 10 Jul 2023 10:56 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
क्रिकेट
व्यापार-उद्योग
राजकारण
























