एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : संजय राऊत यांचा नाशिक दौरा, दुसरीकडं अख्खी सुरगाणा नगरपंचायत शिंदे गटात

Nashik Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) जेव्हा जेव्हा नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत,. तेव्हा तेव्हा शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश होत आहे.

Nashik Sanjay Raut : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तांतरानंतर नाशिकच्या (Nashik) राजकारणाचे निकषच बदलून गेले आहेत. शिवसेनेतील (Shivsena) अनेक जण शिंदे गटात गेल्याने शिवसेना एकटी पडल्याचे चित्र आहे. दुसरीकडे संजय राऊत (Sanjay Raut) जेव्हा जेव्हा नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले आहेत,. तेव्हा तेव्हा शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश होत आहे. नुकतेच संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले असता सुरगाणा (Surgana) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. काल त्यांनी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) जात जोतिर्लिंगाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. यानंतर ते नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या (Surgana Nagarpanchayat) नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला जबर धक्का बसल्याचे या प्रवेशावरून दिसून आले. महत्वाचे म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी (Bhau Chaudhari) यांचा हा मास्टरस्ट्रोक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

संजय राऊत नाशिक मध्ये असताना सुरगाणा नगरपंचायतच्या नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांची ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री संजय राऊत शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी प्रवेश सोहळा झाला. यात नगराध्यक्ष भरत वाघमारे,घटनेता सचिन आहेर, नगरसेविका पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई भोयर यांच्यासह सुरगाणामधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला, असं या नगरसेवकांनी म्हटलं आहे.

 बैलगाडीतून राऊत यांची मिरवणूक

दरम्यान आज सकाळी संजय राऊत निफाड तालुकयातील वडनेरभैरव येथे दौऱ्यानिमित गेले. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कृषी विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनचा सन्मान केला जात आहे. संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय भाऊ चौधरी यांच्या गावात हा कार्यक्रम होत असल्याने राऊत भाषणांत काय बोलतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते कृषी विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वडनेरभैरवमध्ये संजय राऊत यांचे जंगी स्वागत करण्यात आले. येथील ग्रामस्थांनी बैलगाडीतून राऊत यांची मिरवणूक काढण्यात आली. राऊत यांनी वडनेर भैरवमध्ये भैरवनाथ आणि दत्त मंदिरात जावून देवदर्शन घेतल. संजय राऊत यांचे एकेकाळचे निकटवर्तीय भाऊ चौधरी यांच्या गावात हा कार्यक्रम होत असल्याने राऊत भाषणांत काय बोलतात? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Heavy Rain : रस्ते वाहतुकीवर प्रचंड परिणाम,पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांब रांगाPun ST Bus Crowd : पावसाचा एक्सप्रेसला फटका, बससाठी प्रवाशांची मोठी गर्दीMumbai Rain:पावसाचा मंत्री आणि आमदारांना फटका; Amol Mitkari , Anil Patil थेट रेल्वे ट्रॅकवरुन निघालेMumbai Rain Updates : मुंबईतील अंधेरी सब वे ते नागरदास रोडला जोडणारा रस्ता पावसामुळे गेला वाहून

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार, करीरोडचं लालबाग होणार
विधानपरिषदेत आज महत्त्वाचा ठराव; मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Marathi Movie Alyad Palyad Gaurav More : मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मराठी हॉरर कॉमेडीपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई, गौरव मोरेच्या ‘अल्याड पल्याड-2’ ची घोषणा
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
मद्यसाठा घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना एक्साईजची स्कॉर्पिओ उलटली, एक कर्मचारी ठार, दोन पोलीस जखमी
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 56 बंधारे पाण्याखाली; राधानगरी तालुक्यात डोंगराची दरड कोसळून घरात
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
लोकसभेला भाजपच्या लोकांनीही प्रणिती शिंदेंना मतदान केलं, सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट, विरोधात मतदान करणारे भाजपचे लोक कोण? 
Mumbai Rain Updates: मुंबईच्या पावसाचा आमदारांना फटका, मंत्र्यांना रेल्वे ट्रॅकवरून चालण्याची वेळ, अमोल मिटकरींचा व्हीडिओ व्हायरल
मुंबईतील मुसळधार पावसाने आपत्ती व्यवस्थापन-पुनवर्सन मंत्र्यांनाच 'रुळावर' आणलं, व्हीडिओ व्हायरल
Embed widget