(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : संजय राऊत भाजप-शिंदे गटात भांडण लावतायत, गुलाबराव पाटलांचा आरोप
Jalgaon News : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत लढणार आहोत, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Jalgaon News : संजय राऊत (Sanjay Raut) आमच्यामध्ये भांडण लावू पाहत असल्याचा गंभीर आरोप मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला आहे. मात्र त्यांच्यामुळे आमच्यात कोणताही फरक पडणार नाही. आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) आम्ही बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीत लढणार आहोत, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
जळगावमधील एका कार्यक्रमानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजपाच्या (BJP) वतीने आता मिशन लोकसभा (Mission Loksabha) राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पत्रकारांनी त्यांना शिंदे गटाची भूमिका काय असेल असा असा प्रश्न विचारला होता. त्याला त्यांनी हे उत्तर दिले आहे. युतीच्या आमच्या नेत्यांवर आमचा विश्वास आहे, ते जो निर्णय देतील, तो आम्हाला मान्य राहिल, मग तो निर्णय शून्य जागा लढविण्यासाठीचा असला तरी तो आपल्याला मान्य असेल, मात्र ते शिंदे साहेबांनी आम्हाला सांगायला हवे, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान मंत्री मंडळ विस्तार बाबत मुख्यमंत्री (CM eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री हेच सांगू शकतात. शिंदे गटात धुसपुस असल्याचं सांगितलं जातं आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे, की मागच्या सरकारमध्ये ही धुसपूस होती आणि ती राहणारच आहे, धुसपूस झाल्यानेच तर आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असा मिश्किलपणे टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे. एकनाथ खडसे यांच्या परिवाराच्या शेतामधून अवैध गौण खनिज उपसा झाल्याच्या तक्रारी नंतर तातडीने खनिज कर्म विभागाचे पथक काल जळगाव जिल्ह्यात मुक्ताई नगर येथे दाखल झाले आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई केली जात असल्याचा बाबत चर्चा होत असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांचं संदर्भातील हे प्रकरण विधान सभेत मांडले गेले होते. त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे विधान सभेत दिलेले आश्वासन हे सर्वोच्च असल्याने त्यावर लवकर कारवाई होणे अपेक्षित असल्याचं ही गुलाबराव पाटील यांनी म्हटल आहे.
विधानसभेत खडसे कुटुंबियांवर आरोप
नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशना (Winter Session) दरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर सनसनाटी आरोप केला होता. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले होते कि, मुक्ताईनगरमध्ये गौण खनिज घोटाळा झाला असून तब्बल 400 कोटींचा महसूल बुडवला असल्याचे पाटील यांनी सांगितले होते. यावेळी या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश महसूलमंत्री विखेंकडून देण्यात आले होते. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कारवाईचे समर्थन दर्शविले आहे.