एक्स्प्लोर

Nashik Rupali Chakankar : त्र्यंबकेश्वरची घटना हृदय पिळवटून टाकणारी, रुपाली चाकणकर संतापल्या, दिले निलंबनाचे आदेश!

Nashik Rupali Chakankar : राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

Nashik Rupali Chakankar : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील घटना अतिशय धक्कादायक आहे.  या प्रकरणामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे  अशा सूचना आरोग्य संचालकांना दिल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.

राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याचे पुन्हा एकदा नाशिकच्या घटनेने अधोरेखित झाले. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात प्रसुतीसाठी (Delivery) आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्याने आईनेच प्रसुती केल्याची धक्कादायक घटना घडली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आला आहे. आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने आशा वर्कर आणि आईलाच मुलीची डिलिव्हरी करावी लागल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेसंदर्भात रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली असून हृदय पिळवटून टाकणारी घटना असल्याचे म्हटले आहे. 

दरम्यान कालच नागपूर (Nagpur) अंबाझरी तालुक्यामध्ये एका अल्पवयीन गर्भवतीने युटुबवर बघून स्वतःची डिलिव्हरी केली. त्यात तिच्या बाळाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. तर नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात खड्ड्यात गेलेल्या रस्त्यामुळे गर्भवती महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना राज्यातील बिघडलेली कायदा आणि आरोग्य व्यवस्था अधोरेखित करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्या म्हणाल्या की, यामुळे राज्यातील आरोग्य आणि कायदा सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे अधोरेखित होत आहे. राज्य महिला आयोगाने या तिन्ही घटनांची दखल घेतली असून या घटनांतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे सूचना अशा सूचना आरोग्य संचालकांना दिलेल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

आईनेच केली मुलीची डिलिव्हरी 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ दहा पंधरा कुटुंबीयांची वस्ती असलेली बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती काळा जाणवत असल्याने आज सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्याने सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करने प्रसूती करण्याचे ठरविले. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईने स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालुन प्रसूती केली. विवाहितेच्या आईने कशीबशी तरी डिलिव्हरी केली. यावेळी या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. 

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले... 

संबंधित आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकऱ्यांची नियुक्ती आहे. रविवार असल्याने एक वैद्यकीय अधिकारी एका परीक्षेसाठी बाहेर गावी गेले होते. तर दुसरे वैद्यकीय अधिकारी विनापरवानगी गैरहजर होते. अशावेळी आरोग्य केंद्रात एका सिस्टर 24 तास असते.  महिला ज्यावेळी आरोग्य केंद्रात दाखल झाली त्यावेळी लेबर पेन सुरु असल्याने त्यांची डिलिव्हरी झाली. यावेळी कर्मचारी हे सिस्टरला बोलवायला गेलेच होते, मात्र तोपर्यंत प्रसूती झाली होती. सद्यस्थितीत चौकशी सुरु आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Embed widget