(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Child Trafficking : नाशिकच्या चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणांत आतापर्यंत काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर
Nashik Child Trafficking : नाशिक मानवी तस्करी प्रकरणात बिहार येथील पालकांनी 'आमच्या मुलांना सोडा' अशी मागणी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
Nashik Child Trafficking : गेल्या काही दिवसांपासून चाईल्ड ट्रॅफिकिंग (Child Trafficking) प्रकरण वेगवेगळ्या बाजूने वळण घेत असून या प्रकरणात अटकेत असलेल्या मौलानाची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज दुपारी 2 वाजता भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. तर दुसरीकडे याच प्रकरणात बालसुधारगृहात (Juvenile Reformatory) ठेवलेल्या मुलांची सुटका व्हावी, यासाठी बिहारमधून जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात आलेले मुलांच्या पालकांनी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यासह जळगावमधील चाईल्ड ट्रॅफिकिंगचा मुद्दा राज्यभर गाजत असून या प्रकरणात आता नवे वळण मिळाले आहे. या कारवाईत एका मौलवीला ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी (Police Custody) सुनावल्यानंतर आज कोठडी संपत आहे. दुसरीकडे बालकांची सुटका केल्यानंतर महाराष्ट्र बिहार (Bihar) राज्यातील चाईल्ड ट्रॅफिकिंग मुद्दा समोर आला. मात्र मजुरीसाठी किंवा चाईल्ड ट्रॅफिकिंगसाठी मुले पाठवलीच नव्हती असा दावा पालकांनी करत भुसावळसह (Bhusawal) मनमाड गाठले. या पालकांच्या मते अशी कारवाई करण्याआधी पोलिसांनी आमच्याशी संपर्क करायला हवा होता. आता या बालकाच्या सुटकेसाठी पालकांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.
त्यानुसार बाल तस्करी संशय प्रकरणात आजचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे. ताब्यात घेतलेल्या मौलवींची आज पोलीस कोठडी संपत असून सांगलीतील संशयित आरोपीचे बिहार कनेक्शन नक्की काय आहे? याचं उत्तर आज कदाचित मिळू शकणार आहे. भुसावळ रेल्वे पोलिसांच्या अटकेत असलेल्या सांगलीतील संशयित आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार असल्याने दुपारी न्यायालयात त्याला पुन्हा हजर केले जाणार आहे. पोलिसांच्या गेल्या पाच दिवसांच्या चौकशीत नक्की काय माहिती समोर आली आहे, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणांकडून अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली असल्याने आजच्या न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.
आजचा दिवस महत्वाचा ...
तर दुसरीकडे भुसावळच्या बाल निरीक्षण गृहात ठेवलेल्या अल्पवयीन मुलांची सुटका व्हावी, या मागणीसाठी बिहारमधून जळगाव जिल्ह्यात आलेले पालकांनी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या पालकांकडून रेल्वे पोलिसांच्या कारवाईवर आधीच संशय व्यक्त करण्यात आला आहे. या भेटीत नेमकं काय घडलं हे अद्याप समोर आलेले नाही. जिल्हाधिकारी बालकांच्या सुटकेबाबत काय निर्णय घेतात हे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर कोठडी संपत असलेल्या संशयितांबाबत न्यायालयाची भूमिका काय असणार आहे, हे देखील स्पष्ट होणार आहे.