एक्स्प्लोर

Sangamner Balasaheb Thorat : सरकार स्मार्ट सिटी, मेट्रोत व्यस्त, शेतकरी झाला दुय्यम; बाळासाहेब थोरातांचे टीकास्त्र 

Sangamner : शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे, हे विसरून चालणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर निशाणा साधला.  

Sangamner Balasaheb Thorat : आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचं काम केलं. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सरकारवर निशाणा साधला.  

आज संगमनेर (Sangamner) शहरात राज्यातील कांदाआणि वीजप्रश्नी केलेल्या ठिय्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक भाषण करत सरकरच्या धोरणाचा निषेध केला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अनेक संकटाना तोंड देत असून विधानसभेत आवाज उठवल्यानंतर आज बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर बसस्थानका समोर ठिय्या आंदोलन (Protest) करत सरकारला धारेवर धरले. कांदा आणि वीजप्रश्नी संगमनेर बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जयश्री थोरात यांच्यासह डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) देखील आंदोलनात सहभागी झाले होते. एका युवा शेतकऱ्याने बळीराजाची व्यथा यावेळी कवितेतून व्यक्त केली.  

तब्बल 2 तास चाललेल्या या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते. तर शिवसेना ठाकरे गटाने मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचं दिसून आले. बाळासाहेब थोरात यांनी भाषणातून राज्य सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली. ते यावेळी म्हणाले की, "यापूर्वी आमचं सरकार ज्या ज्या वेळी सत्तेत होतं त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहताना खर्चाचा विचार न करता मदत करण्याचं काम केलं. आजच्या सरकारमध्ये मात्र शेतकरी दुय्यम झाला आहे. ते आज स्मार्ट सिटी आणि मेट्रोत व्यस्त झाले. मात्र ही शहर मोठी झाली ती शेतकऱ्याच्या कष्टामुळे हे विसरुन चालणार नाही. व्यापारी कवडीमोल भावाने कांदा खरेदी करतो आणि नाफेडला विकतो अशी परिस्थिती आहे."

महाराष्ट्रात जिरवाजिरवीचं राजकरण

राज्याचे प्रश्न सोडवण्याऐवजी काही नेते जिरवाजिरवीचं राजकरण करत आहेत. मात्र एक दिवस तुमची जिरेल हे लक्षात ठेवा, असा टोला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात महसूलमंत्री विखे यांचे नाव न घेता लगावला आहे. तर अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्षात ठेवा सरकार आज असतं, उद्या नसतं, तुम्ही नियमाप्रमाणे काम करा.. कोणाचे फोन आले म्हणून जिरवाजिरवीचे उद्योग तुम्ही करु नका, असा दमच बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. मध्यप्रदेशमधील वीज बिल माफीबाबत खूप मोठी भाषण केली. आज अनेक जुनी भाषण व्हायरल होत आहेत. त्यांनी केलं तर आता तुम्हाला का करता येत येत नाही. आज कांदाच नव्हे तर भाजीपाल सुद्धा फुकट देण्याची वेळ आली आहे. 2014 ला गॅस सिलेंडर 350 आज 1100 च्या वर गेली. त्यावेळी 5 रुपये वाढल्यावर टाकीवर बसून घोषणा देणारी बाई कुठे गायब झाली? लबाडी कशी करायची याचं उदाहरण आज दिसत असल्याचं थोरात म्हणाले. 

आमचा विजय नक्की होता..... 

कसबा पोटनिवडणुक निकालावर थोरात म्हणाले की, यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर सर्व्हे सुद्धा झाला होता. त्यांनी सांगितलं होतं महाविकास आघाडी एकत्र लढली तर 34 खासदार निवडून येतील. त्याचा परिणाम कसबा पोटनिवडणुकीत दिसून आला. आम्ही दगड उभा केला तरी निवडून आणू अस म्हणणाऱ्या भाजपला तिथे धूळ खावी लागली. चिंचवडमध्ये सुद्धा बंडखोरी झाली नसती तर आमचा विजय नक्की होता. याचाच अर्थ जनमत आता भाजपच्या विरोधात चाललं आहे. 2024 निवडणुकीवर ते म्हणाले की, 2024 मध्ये संपूर्ण बदल देशाच्या राजकारणात होईल. आता जे दहशत आणि सुडाचे वातावरण आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे, याचा एकत्रित परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसेल, असेही ते म्हणाले.

काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण नाही.. 

शिंदे फडणवीस सरकारने एसटी संदर्भात केलेली जाहिरात व्हायरल झाली. याचे पडसाद विधानसभेतही दिसून आले. यावर थोरात म्हणाले की, गतिमान सरकार जाहिरातीत खर्च करण्याऐवजी लोकांच्या मदतीसाठी खर्च केले तर त्याचा उपयोग होईल. जाहिरात देऊन कोणी गतिमान होत नसतं ही वस्तुस्थिती आहे. तर संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीवर झालेला हल्ला हा राज्यातील कायदा सुव्यवस्था नष्ट झाली आहे, हे स्पष्टपणे दाखवते. तसेच काँग्रेसच्या अतंर्गत वादावर ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण नाही. तुम्ही प्रसिद्ध केलं तेच मला माहित असल्याचे म्हणाले. दरम्यान आज झालेल्या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाने मात्र पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. आजच्या आंदोलनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
Embed widget