(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Nashik News : नाशिक महापालिका अतिक्रमण पथकावर दगडफेक, अनधिकृत झोपड्या हटवताना नागरिक संतप्त
Maharashtra Nashik News : नाशिक महापालिका (Nashik NMC) अतिक्रमण पथकावर संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे.
Maharashtra Nashik News : नाशिक महापालिका (Nashik NMC) अतिक्रमण पथकावर संतप्त नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू असताना हा सगळा प्रकार घडला आहे. त्यानंतर पोलिसांकडून (Nashik Police) या नागरिकांची धरपकड करण्यात आली असून या प्रकारानंतर दंगल नियंत्रण पथकाच्या बंदोबस्तात अतिक्रमणांवर कारवाई आली. या मोहिमेत जवळपास पंधरा अधिक झोपड्या हटविण्यात आल्या आहेत.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक महापालिकेच्या (Nashik Mahapalika) वतीने शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण मोहीम (Encroachment Campaign) राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पंचवटी विभागातील गंगा गोदावरी गौरी पटांगण येथील झोपडपट्टी काढण्याचे काम सुरू असताना अतिक्रमण पथकावर दगडफेक केल्याची घटना घडली होती. यावेळी पथकातील अनेक कर्मचारी जखमी झाल्याचे समोर आले होते. पंचवटीतीलच पेठरोड भागात अतिक्रमण पथकावर स्थानिक नागरिकांकडून अतिक्रमण विभाग कार्यवाही करताना दगडफेक करण्यात आली आहे.
नाशिक (Maharashtra Nashik News) शहरातील पेठरोड परिसरातील मार्गावर अनेक झोपड्या वसलेल्या आहेत. यात झोपड्या हटवण्याचे काम आज सकाळपासून नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik NMC News) अतिक्रमण विभागाकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान काही वेळापूर्वी स्थानिक नागरिकांकडून पथकावर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. अतिक्रमण पथकातील जेसीबीवर देखील दगडफेक करण्यात आल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर दंगल नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर काही नागरिकांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. आता पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर तणाव देखील निवळला आहे.
आज सकाळपासून सुरु असलेल्या कारवाईत जवळपास पंधराहून अधिक झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. आज सायंकाळपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. आज सकाळपासून महापालिका अतिक्रमण विभागाकडून करण्यात आली. पोलीस नियंत्रण पथकाने काही नागरिकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला असून पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई सुरू आहे.
Maharashtra Nashik News : मनपाकडून नागरिकांना इशारा
नाशिक मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी सांगितले की, पंचवटी परिसरातील 20 झोपड्या हटविण्यात आल्या असून या रहिवाशांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विभागीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळपासून ही कारवाई सुरळीत सुरू होती. काही वेळापूर्वी काही मुलांनी गोंधळ घालून दगडफेक केली. यात कुणीही जखमी नाही. मात्र जेसीबीचे मोठे नुकसान झाले. नुकसान करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे अशाप्रकारे कुणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तर गुन्हा दाखल केला जाईल.