Nashik News : केंद्रात, राज्यात वारकऱ्यांचे सरकार, नाशिकमध्ये लवकरच वारकरी भवन : राज्यमंत्री भागवत कराड
Nashik News : वारकरी भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास निधी कमी पडू देणार नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) वारकरी भवनासाठी (Varkari Bhavan) जागा सुचवा, प्रस्ताव द्या, सीएसआरमधून निधी देतो, काळजी नसावी. केंद्रात, राज्यात वारकऱ्यांचे सरकार आहे. निश्चित आम्ही वारकऱ्यांसोबत आहोत, असे मत नाशिकच्या वारकरी संमेलनात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी व्यक्त केले.
नाशिकच्या पंचवटी येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय परिसरात हभप त्र्यंबकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या एकदिवसीय वारकरी संमेलनात विविध ठराव पारित करण्यात आले. यावेळी मंत्री भागवत कराड हे बोलत होते. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर व्हावी, ही अनेक पिढ्यांची इच्छा होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे मंदिर साकारत असून आगामी वर्षभरात भाविकांना तेथे दर्शन घेता येणार आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून काशी या तीर्थक्षेत्राचा देखील विकास सुरू आहे. देशात आणि राज्यात वारकरी संप्रदायाला मानणारे सरकार असल्याने नाशिक मधील वारकरी भावनाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील त्यासाठी नाशिकमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास सीएसआर च्या फंडातून भरघोस निधी मिळून देऊ तसेच संमेलनातील चारही ठरावून बाबत राज्य सरकार सोबत चर्चा करणारा चे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, मी वारकरी आहे, मी वारकऱ्यांमध्ये येणं हे माझे भाग्यच, नाशिक ही प्रभू रामाची, गोदेची भूमी, याच भूमीत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत संत निवृत्तीनाथ महाराज समाधी आहे. या समाधीसाठी या आधी प्रसाद योजनेतून 15 कोटी मिळाले, अजून अतिरिक्त लागणारा निधी नक्की देईल, त्याचबरोबर वारकरी भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास निधी कमी पडू देणार नाही, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याच्यासोबत चर्चा करणार आहे. त्याचबरोबर गोदाकाठी दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा नाशिकची ओळख आहे आगामी कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी राज्य केंद्र सरकारच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, निधीची कोणती कमतरता भासू दिली जाणार नाही.
वारकरी संमेलनात सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान सुरू झालेल्या वारकरी सम्मेलनात हभप गंगाधर महाराज कवडे यांचे हरी कीर्तन यावेळी झाले. यावेळी वारकरी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून संत निवृत्तीनाथ संस्थानचे माजी अध्यक्ष तथा आळंदी येथील वारकरी शिक्षन संस्थेचे विश्वस्त हभप त्र्यंबकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री भागवत कराड यांच्या उपस्थितीत महत्वाचे ठराव यावेळी पारित करण्यात आले. नाशिकमध्ये वारकरी भवन व्हावे, संतपीठाची उपशाखा त्र्यंबक, नाशिकला व्हावी. संत वाङमय स्वस्त मिळावे, कीर्तनकार,प्रवचनकार कथाकार यांनी वारकरी आचारसंहिता पाळून विधाने, निरूपणे करावी. महाराष्ट्र ब राज्यातील तीर्थक्षेत्र पूर्ण व्यसनमुक्त परिसर व्हावे, येथे मुक्या जीवाची पशुहत्या थांबावी. ब्रह्मगिरीचे उत्खनन थांबवावे तसेच जल जमीन डोंगर वाचवा. संत निवृत्तीनाथ पालखी मार्ग गैझेट मध्ये यावा, संत निवृत्तीनाथ पालखीचा प्रसार प्रचार व्यापक व्हावा, अशा प्रकारचे ठराव मांडण्यात आले.