Nashik News : म्हणे, नाशिक जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत अन् इथं सोयीची स्मशानभूमीही नाही!
Nashik News : नाशिक जिल्ह्यात तेल कंपन्यामुळे नावारुपास आलेली श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते.
Nashik News : तेल कंपन्यामुळे नावारुपास आलेली नांदगांव (Nandgoan) तालुक्यातील श्रीमंत समजली जाणाऱ्या पानेवाडी ग्रामपंचायतीला (Panewadi Grampanchayat) गावासाठी अद्यापही सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध करुन देता आले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारावेळी मृताचे नातेवाइक आणि ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतीची नसून ती खासगी असल्याचे सांगून ग्रामपंचायत स्मशानभूमिच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करत असून वेळ मारून नेत असल्याचे चित्र आहे.
नाशिकच्या (Nashik) नांदगांव तालुक्यातील श्रीमंत समजली जाणाऱ्या पानेवाडी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला राज्य, केंद्राच्या विविध योजनाचा निधीसह तेल कंपन्यांकडून दरवर्षी लाखोचा निधी येतो. परंतु या निधीतून गावात अदयाप मूलभूत सुविधाही मिळालेल्या नाही. मनमाड (Manmad) पासून सात किमी अंतरावर असलेल्या पानेवाडी गावातील लोकसंख्या तीन ते चार हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतला मिळणारा निधी पाहता गावात चांगले रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा संकलन, पथदीप, आरोग्य आदी सुविधां मिळणे अपेक्षित असताना सध्यास्थित काहीही होताना दिसत नाही. गावातील रस्ते उखडले असून स्वच्छतेचे तीन तेरा असून गावातील कचरा गोळा करण्याचे कोणतेही नियोजन नाही. काही महिन्यांपूर्वी गावात केलेले सिमेंटचे रस्ते उखडले असून खडी उघडी पडली आहे. जिवंतपणी पायाभूत सुविधांसाठी त्रस्त असणार्या व्यक्तींचा मृत्यूनंतरही स्मशानभूमित ज्या सुविधा मिळायला हव्यात. त्या देखील मिळू शकत नसल्याने यावर रोष व्यक्त होत आहे.
पानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या सुविधांचा अभाव पाहता याकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्यकार्य अधिकारी यांनीच लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीला मोठया प्रमाणात निधी मिळत असताना गावासाठी चांगल्या स्मशानभूमिसह इतर सुविधा का मिळू शकत नाही. असा सवाल उपस्थित केला जातोय. याप्रशनी ग्रामपंचायत केवळ पाहण्याची भूमिका घेतेय का, अशी चर्चा होत आहे. ग्रामपंचायत ची आर्थिक स्थिती ठीकठाक नसती तर एकवेळ समजले असते. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ग्रामपंचायत याकडे का दुर्लक्ष केले जातेय हा संशोधनाचा विषय आहे.
खासगी जमीन आणि शासकीय जमीन याचा वाद चालू आहे. त्यामुळे तेथे कोणतेही काम करताना येत नाही. स्मशानभूमी स्थलांतर करण्याबाबत सरपंच व ग्रा. संदस्य यावर निर्णय घेतील अशी माहिती पानेवाडीचे ग्रामसेवक डी.आर. निकम यांनी दिली. तर पानेवाडीचे सरपंच म्हणाले कि, स्मशानभूमीची ग्रामनिधी मधून सुधारणा केली असती, मात्र जागा खासगी असल्याने तेथे कोणतेही काम करु दिले जात नाही. स्मशानभूमी स्थलांतर करण्यासाठी विचारधीन असताना यास काही ग्रामस्थांचा विरोध आहे. तर नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रसिहं परदेशीं म्हणाले कि, माझ्याकडे दोन हजार गावे असून मी बाहेरगावी आहे. मात्र नाशिकला येताच पानेवाडी ग्रामपंचायतसाठीच्या स्मशानभूमी बाबतची माहिती घेऊन त्यावर कार्यवाही करेल, असे ते म्हणाले.
लाइटसह पाण्याची व्यवस्था नाही
गावातील स्मशानभूमीची अवस्था इतकी बिकट आहे की, अंत्यसंस्कार करताना जाताना पायात काटे भरतात. तर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करायचे म्हटले तर मोठे आव्हानच ठरेल. कारण येथे कोणतीही विद्युत बल्बची सुविधाच नाही. पाण्याचे कनेक्शन नाही. बसण्यासाठी तर सोडा उभे राहण्यासाठी जागा नाही. त्यामुळे मृत्यूनंतरही अंत्यसंस्काराचे सोपस्करासाठी अडथळ्यांची शर्यतच करावी लागत असल्याचे चित्र आहे. अडचणीचे ठरत्त असल्याने यामुळे मृताच्या नातेवाइकांसह अंत्यसंस्काराला येणार्यांना केवळ अन केवळ मानसिक त्रासालाच सामोरे जावे लागत्ते आहे. मृत्यूनंतरही मरण सोपे झाले नसल्याचे वास्तव पानेवाडी ग्रामस्थांना अनुभवयाला मिळत आहे.