(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Pankaja Mundhe :...म्हणून भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला हजर, पंकजा मुंडेंनी दिल स्पष्टीकरण
Nashik Pankaja Mundhe : एकाच हॉटेलमध्ये आम्ही एकत्र थांबलो होतो, त्यांची गाडी पहिली आली. त्यामुळे आम्ही सोबत आलो, अशी माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.
Nashik Pankaja Mundhe : महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची (BJP) जी नियमानुसार कार्यकारणी व्हायला पाहिजे, ती राज्याची कार्यकारणी आता झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा ही कार्यकारणी होती. मी भाजपच्या बैठकीत उपस्थित आहे, कारण मी कोअर कमिटीत असून राष्ट्रीय सचिव आहे, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांनी दिले आहे.
नाशिकमध्ये (Nashik) दोन दिवशीय भाजप कार्यकारिणीची बैठक (BJP Meet) सुरु असून आजचा दुसरा दिवस आहे. अशातच आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) आणि पंकजा मुंडे हे एकाच गाडीतून आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मात्र यावर स्वतः पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले असून भाजप कार्यकारिणीच्या बैठकीसाठी नाशिकमध्ये आल्यानंतर आम्ही एकाच हॉटेलला थांबलो होतो. हॉटेलमध्ये माझी गाडी मागे होती आणि त्यांची गाडी पुढे लागली होती. त्यामुळे आम्ही एकाच गाडीत आलो, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची जी नियमानुसार कार्यकारणी व्हायला पाहिजे, ती राज्याची कार्यकारणी आता झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा ही कार्यकारणी होती. मी भाजपच्या बैठकीत उपस्थित आहे, मी कोअर कमिटीत असून राष्ट्रीय सचिव आहे. राज्याच्या भाजप कार्यकारिणी ही महत्वाची असून अनेक विषयांवर चर्चा होते, त्यानुसार आज देखील नाशिकमध्ये होत असलेल्या बैठकीला अनेक विषयांवर चर्चा झाली, अजून चर्चा होणार आहे. राजकीय प्रस्तावावर चर्चा झाली. येणाऱ्या आगामी काळात भाजप अनेक उपक्रम राबविणार आहे. त्यात युवा वर्गाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी भाजपच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आगामी विविध उपक्रमासाठी युवा वर्ग अग्रेसर असणार आहे. यात युवा वॉरियर, बूथ रचना, इतर विविध कार्यक्रमांबद्दल चर्चा झाली. युवा मोर्चा कसा जास्तीत जास्त ऍक्टिव्ह व्हावा किंवा युवा मतदार कसा आकर्षित होईल, याच्यासाठी भारतीय जनता पार्टीने काय करावे? यावर चर्चा झाल्याचे पंकजा यांनी सांगितले. सरकारचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला. सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अपेक्षा, एक आशा निर्माण झाली. आपण चांगलं काम करून जनतेपर्यंत पोहोचू शकतो. लोकांचा विकास करू शकतो, या माध्यमातून ही भावना निर्माण झाली.. त्यामुळे नक्कीच सरकारने जे निर्णय घेतले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
म्हणून एकाच गाडीतून आलो...
आज देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे एकाच गाडीतून भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित झाल्या. एकाच हॉटेलमध्ये आम्ही एकत्र थांबलो होतो, त्यांची गाडी पहिली आली. त्यामुळे आम्ही सोबत आलो, अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या 'मी आणि देंवेंद्रजी एकाच हॉटेलमध्ये रहायला होतो. त्यांची गाडी पुढे लागली होती, माझी गाडी मागे होती. त्यामुळेच मी त्यांच्या गाडीत बसून कार्यकारिणीच्या बैठकीला आले असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.