(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Igatpuri News : मोठी बातमी! इगतपुरीत विषबाधा झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू, चार विद्यार्थ्यांवर उपचार सुरु
Igatpuri News : इगतपुरी (Igatpuri) येथील आश्रम शाळेत (Ashram School) विषबाधा (Poisoning) झाल्याने दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Igatpuri News : इगतपुरी (Igatpuri) येथील मतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रम शाळेत (Ashram School) उलट्याहून दोन मतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर इतर चार जण गंभीर जखमी असून त्यांना इगतपुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात (Sub District Hospital) हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
इगतपुरी शहरात मतिमंद मुलांची शाळा असून या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली आहे. सकाळी शाळेतील निवासी मतिमंद मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना इगतपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र या ठिकाणी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हर्षल गणेश भोईर व मोहम्मद जुबेर शेख अशी दोघं विदयार्थ्यांची नावे आहेत.
इगतपुरी शहरात अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कारण बधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थां आहे. या विद्यालयात 120 विद्यार्थी असुन मंगळवारी रात्री खिचडीचे जेवन केल्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास यातील 08 विद्यार्थ्यांना उलटयाचा त्रास सुरु झाला. यामुळे या विद्यार्थ्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यु झाला तर दोन विद्यार्थीची प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवले असुन चार विद्यार्थ्यांवर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली असल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तर चार विदयार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. तर उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी सुरू झाली असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम बी देशमुख पथकासह दाखल झाले आहेत. विद्यार्थ्यांनी खाल्लेले अन्नाचे नमुने जमा करण्यात आले आहेत. तर प्रथमेश निलेश बुवा, वय १७ व देवेंद्र कुरुंगे वय १५ वर्ष या दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिकला पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित मुलांची तपासणी सुरू केली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे मुतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अनुसयातत्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंद्रागा भरती कर्णबधिर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयं सहाय्यता केंद्र असे मतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थांची नावे आहेत.
इतर संबंधित बातम्या :