एक्स्प्लोर

Nashik Zarif Baba : बहुचर्चित झरीफ बाबाचा खून कॉन्ट्रॅक्ट किलरकडून, आतापर्यंत सहा जणांना अटक, 35 लाखांची मालमत्ता जप्त

Nashik Zarif Baba : झरीफ बाबा (Zarif Baba Murder) खून प्रकरणी नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी मुख्य संशयितास (Murder Suspect) अटक करण्यात आली असून 30 ते 35 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

Nashik Zarif Baba : झरीफ बाबा (Zarif Baba Murder) खून प्रकरणी नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांनी मुख्य संशयितास अटक करण्यात आली असून याचबरोबर प्रकरणातील सहा जणांना अद्यापपपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच झरीफ बाबांच्या मालमत्तेच्या चौकशीसाठी विशेष एसआयटी समिती (SIT) स्थापन करण्यात आली असून मनमाडचे डीवायएसपी या समितीचे हेड असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांनी दिली आहे. 

मागील महिन्यात 5 जुलै रोजी येवला तालुक्यातील (Yeola Police) चिंचोडी औद्योगिक शिवारात जरीफ अहमद चिश्ती उर्फ झरीफ बाबा (Zarif baba) या निर्वासित अफगाण सुफी धर्मगुरुंचा गोळी झाडून खून करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण जिल्ह्यासह राजभर गाजले. झरीफ बाबांच्या साथीदारांनीच खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयितास देखील सापळा रचून राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. संतोष हरिभाऊ ब्राह्मणे असे पकडलेल्या सराईत संशयिताचे नाव आहे.

शिवाय झरीफ बाबा चिस्ती यांच्या खून प्रकरणी आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षकांच्या अधिपत्याखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. झरीफ बाबांची भारतातील मालमत्ता, इतर संपत्तीची चौकशी करण्यासाठी विशेष समिती मनमाडचे डीवायएसपी मुख्य तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून 30 ते 35 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. 

एसआयटी चौकशीतून.... 
दरम्यान झरीफ बाबांच्या खून प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली असून यामध्ये तीन ते चार पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून झरीफ बाबांचे बँक अकाउंट, इतर प्रॉपर्टी याची व्याप्ती पहिली जाणार आहे. आर्थिक देवाणघेवाण, कुठून कुठून पैसे ट्रान्सफर झाले, वेगवेगळ्या प्रॉपर्टीजचे ट्रांजेक्शन कसे झाले हे पहिले जाणार आहे. त्यासाठी एसआयटी चौकशीसाठी स्थापन केली असून मनमाडच्या डीवायएसपी हे मुख्य तपास अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

मुख्य संशयित कॉन्ट्रॅक्ट किलर 
झरीफ बाबा खून प्रकरणातील मुख्य संशयितास राहुल येथील एका हॉटेलातून अटक करण्यात आली. झरीफ बाबा यांचा ड्रॉयव्हर व संबंधित सराईत गुन्हेगार या दोघांनी हा खुनाचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील मुख्य संशयित संतोष ब्राम्हणे हा सराईत गुन्हेगार असून कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून ओळखला जातो. या दोघांनी प्रामुख्याने झरीफ बाबांचा खून घडवून आणल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bavana Gawali : भावना गवळींचा संजय राठोड यांच्यावर रोषMilind Deora : दलित असल्याने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी नाकारली  - मिलिंद देवराABP Majha Headlines : 8 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar : भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं - रोहित पवार

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
साडी-किराणा म्हणजे रवी राणा, भाजपला मतदान करू नका; सुजात आंबेडकरांचां राणा दाम्पत्यावर जोरदार निशाणा
Ravindra Jadeja Catch CSK vs LSG:  कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्
Ajit Pawar : कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
कचाकचा बटण दाबा, मतदान करा; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोग चौकशी करणार
CSK vs LSG IPL 2024: MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
Mukesh Khanna :
"लग्नाआधीच मुलगा आणि मुलगी..."; 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना स्पष्टच म्हणाले...
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
Travel : 'मामाचं गाव नंतर, आधी फिरायला चला!' उन्हाळी सुट्टीत कमी बजेटमध्ये फिरायचय? भारतीय रेल्वेची प्रवाशांसाठी खास ऑफर..
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Embed widget