Nashik News : श्रावण सोमवार निमित्त नाशिकच्या रस्ते वाहतुकीत बदल, वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग
Nashik News : श्रावणातील तिसऱ्या सोमवारी (Shrawan Somwar) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) जाण्यासाठी सीबीएस बस स्थानक (Nashik CBS) परिसरात गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीवर प्रतिबंध घातले आहेत.
Nashik News : श्रावणातील तिसऱ्या सोमवारी (Shrawan Somwar) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे जाण्यासाठी भाविकांची सीबीएस बस स्थानक (Nashik CBS) परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी रविवारी दुपारी दोन ते सोमवारी रात्री दहा या वेळेत सीबीएस बस स्थानक परिसरातील वाहतुकीवर प्रतिबंध घातले आहेत. या काळात सीबीएस ते शरणपूर रस्त्यावरील टिळकवाडी सिग्नल या मार्गावरील जा करणाऱ्या सर्व खाजगी वाहनधारकांना प्रवेश बंद राहणार आहे.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी (Bramhgiri Feri) हजारो भाविक जातात त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळात जुन्या स्थानकातून जादा बस गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे त्र्यंबकेश्वरला ये-जा करणाऱ्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शरणपूर रस्त्यावरील वाहतुक प्रतिबंधित केली जाणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजेपासून ते सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत हे निर्बंध असतील. त्यानुसार सीबीएस चौकातून शरणपूर रस्त्याने टिळकवाडी चौफुली पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर राज्य परिवहन आणि शहर वाहतुकीची बस सेवा वगळून अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
सीबीएस चौकातून टिळकवाडी सिग्नलकडे जाणाऱ्या वाहनांना सीबीएस चौकातून मोडक सिग्नल हॉटेल राजदूत मार्गे अथवा सीबीएस सिग्नल येथून मेहेर सिग्नल अशोक स्तंभ मार्गे गंगापूर रस्त्याने पुढे इतरत्र जाण्याचा पर्याय राहील. श्रीरामपूर रस्त्याने टिळकवाडी सिग्नल येथून सीबीएस चौकाकडे एसटी आणि शहर बस वाहतुकीची बस सेवा वगळून इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे व उपरोक्त काळात या मार्गावरील वाहतूक टिळकवाडी सिग्नल कडून जलतरण तलाव सिग्नल मोडक सिग्नलहून सीबीएस कडे जाईल. अथवा टिळकवाडी सिग्नलक वरून पंडित कॉलनी मार्गे गंगापूर रस्त्याने अशोक स्तंभ मार्गे पुढे इतरत्र जाईल. हे निर्बंध पोलीस सेवेतील वाहन हे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत याबाबतची अधिसूचना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे काढली आहे.
हे असतील पर्यायी मार्ग
दरम्यान सीबीएस परिसरात वाहतूक बंद असल्याने पर्यायी मार्ग म्हणून टिळकवाडी कडून सीबीएसकडे जाणारी वाहतूक ही टिळकवाडी सिग्नल वरून जलतरण तलावाकडून त्र्यंबक रोडवर मोडक सिग्नल हॉटेल मार्गावरून सीबीएसकडे वळवली जातील. दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे टिळकवाडी सिग्नल वरून पंडित कॉलनी मार्गे गंगापूर रोड आणि पुढे अशोक स्तंभ मार्गे पुढे इतरत्र वाहने वळवण्यात आले आहेत. वाहनांसाठी प्रवेश बंद असलेल्या मार्गावरून मात्र रुग्णवाहिका सेवा, अग्निशमन दलाची वाहने तसेच पोलिसांकरता वाहतूक सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.