(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Maratha Seva Sangh : छत्रपतींनी सुरु केलेल्या परंपरा नष्ट करणार का? मराठा सेवा संघाला पुजारी वर्गाचा सवाल
Nashik : छत्रपतींनी अनेक मंदिरात पूजा लावून दिलेल्या आहेत. छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा सवाल मंदिर पुजाऱ्यांनी मराठा सेवा संघाला केला आहे.
Nashik Maratha Seva Sangh : स्वतः शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) गो ब्राम्हण प्रतिपालक होते, त्यामुळे ब्राम्हण आणि पुजारी हा मंदिराचा अविभाज्य घटक आहे. वैदिक काळापासून या परंपरा सुरू आहेत. तसेच छत्रपतींनी स्वतः अनेक मंदिरात त्रिकाल पूजा लावून दिलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा सवाल मंदिर पुजाऱ्यांनी मराठा सेवा संघाला केला आहे.
मराठा सेवा संघाचे (Maartha Seva Sangh) अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी याबाबत महत्वाचे वक्तव्य करताना मंदिरात बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी, अशी मोठी मागणी केली. त्यानंतर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या विधानावर नाशिक (Nashik) येथील मंदिर पुजाऱ्यांनी खेडेकर यांना प्रश्न विचारला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मंदिर आणि पुजारी हे समीकरण बनलेले आहे. यातील धार्मिक, पूजा विधी हे वैदिक काळापासून परंपरागत सुरु आहे. छत्रपतींनी स्वतः अनेक मंदिरात त्रिकाल पूजा लावून दिलेल्या आहेत. त्यामुळे छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा सवाल मंदिर पुजाऱ्यांनी मराठा सेवा संघाला केला आहे.
छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती (Sanyogita Raje Chatrapati) यांना वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. हा वाद सुरु असतानाच आज मराठा सेवा संघाने याबाबत महत्वाचे विधान केले आहे. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले कि, आता मंदिरे ब्राह्मणमुक्त करण्याची वेळ आली आहे, ब्राह्मणांच्या ऐवजी मंदिरात बहुजन समाजातील मुला-मुलींची नियुक्ती करावी अशी मोठी मागणी केली आहे. यावर नाशिकच्या (Nashik) प्रसिद्ध कपालेश्वर मंदिरातील पूजाऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.
यावेळी मंदिर पुजारी म्हणाले कि, मराठा सेवा संघाची मागणी पूर्णतः चुकीची असून स्वतः शिवाजी महाराज गो ब्राम्हण प्रतिपालक होते. त्यामुळे ब्राम्हण आणि पुजारी हा मंदिराचा अविभाज्य घटक आहेत. वैदिक काळापासून या परंपरा सुरू आहेत. छत्रपतींनी स्वतः अनेक मंदिरात त्रिकाल पूजा लावून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता छत्रपतींनीच सुरू केलेल्या गोष्टी तुम्ही नष्ट करणार का? असा आमचा मराठा सेवा संघाला सवाल असल्याचे पुजाऱ्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, त्यांनी जर विरोध केला तर आम्ही लढा देऊ, शिवाय छत्रपतीनी मंदिराला ताम्रपटही लिहून दिले आहेत. वेळ पडल्यास न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा देखील पुजाऱ्यांनी दिला आहे.
मराठा सेवा संघाच्या मागणीला विरोध
भारतातील कोणत्याही तीर्थक्षेत्री गेलात तर ब्राम्हणाशिवाय कुठलेही धार्मिक कर्म होत नाही, ही परंपरा आहे. शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे यांनी सुरू केलेल्या परंपरा असल्याने त्यानं नष्ट करणे सोपे नसल्याचे पुजारी म्हणाले. वेदोक्त, पुराणोक्त हा वाद का? प्रत्येकाची श्रद्धा आहे. जातीयवाद का करताय? ब्राम्हण, मराठा, क्षत्रिय हा वाद का? आपण सर्व हिंदू आहोत हे महत्वाचे आहे. आमच्याकडे या अभिषेक करा, पूजा करा म्हणून, आम्ही म्हणत नाही. लोकांची श्रद्धा आहे, म्हणून लोक आमच्याकडे येतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने केलेली मागणी अतिशय चुकीची त्या मागणीला आमचा विरोध आहे.