(Source: Poll of Polls)
भुजबळांनी निवडणूक लढवल्यास 48 मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील, सकल मराठा समाजाचा महायुतीला गंभीर इशारा!
Sakal Maratha Samaj PC : छगन भुजबळ निवडणूक लढविणार असतील तर सकल मराठा समाजाचा उमेदवार त्यांच्यासमोर उभा करणार, असे सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत (Mahayuti Seat Sharing) नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha Constituency) जोरदार रस्सीखेच सुरु आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) हे निवडणुकीसाठी आग्रही आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी कमालीचे इच्छुक आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाकडून (BJP) देखील नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी माझे नाव दिल्लीतून चर्चेत आले असे म्हणत नाशिक लोकसभेसाठी रणशिंग फुंकले. तर भाजपची नाशिकमध्ये जास्त ताकद असल्याने नाशिकची जागा भाजपला मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र या जागेची उमेदवारी छगन भुजबळ यांना मिळणार असे बोलले जात आहे. आता सकल मराठा समाजाकडून (Sakal Maratha Samaj) छगन भुजबळांच्या विरोधात शड्डू ठोकण्यात आला आहे.
भुजबळांना उमेदवारी देऊन पायावर धोंडा मारून घेऊ नका
नाशिक येथे सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद पार पडली. यात मराठा समाजाचे पदाधिकारी म्हणाले की, छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहे. एका समाजाविषयी खालच्या पातळीवर बोलणाऱ्यांना उमेदवारी का दिली जात आहे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. ही पत्रकार परिषद कुठल्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी म्हणून नाही. छगन भुजबळ यांना उमेदवारी देऊन पायावर धोंडा मारून घेऊ नका. छगन भुजबळ कायम मराठा समाजाच्या विरोधात आहे. भाजप म्हणते सर्व्हेवर चालतो, पण एकही माणूस म्हणणार नाही, भुजबळ यांना उमेदवारी द्या, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
त्यांना पुन्हा उमेदवारी कशासाठी देत आहात?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तुम्ही मराठ्यांना डिवचण्याचे काम करत आहात. 48 मतदारसंघात याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील. मराठ्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली. पावणे दोन आणि पावणे तीन लाख मतांनी पराभव झाला त्यांना पुन्हा उमेदवारी कशासाठी देत आहात, असा हल्लाबोल यावेळी करण्यात आला.
छगन भुजबळांविरोधात उमेदवार उभा करणार
छगन भुजबळ यांच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेउन भूमिका जाहीर करणार आहोत. छगन भुजबळ निवडणूक लढविणार असतील तर सकल मराठा समाजाचा उमेदवार त्यांच्यासमोर उभा करणार, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. छगन भुजबळांना जर नाशिकमधून उमेदवारी मिळाली तर मराठा समाज त्यांच्या विरोधात नक्की कोणाला उभे करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
Hemant Godse : उमेदवारीची घोषणा कधी होणार? खासदार हेमंत गोडसेंनी थेट मुहूर्तच सांगितला!