Hemant Godse : उमेदवारीची घोषणा कधी होणार? खासदार हेमंत गोडसेंनी थेट मुहूर्तच सांगितला!
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत कायम आहे. हेमंत गोडसे यांनी त्यांना उमेदवारी कधी जाहीर होणार याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
Hemant Godse : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा (Nashik Lok Sabha Constituency) गुंता महायुतीत (Mahayuti Seat Sharing) सुटायचे नाव घेत नाहीये. राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि शिवसेना शिंदे गट या जागेसाठी आग्रही आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नाशिकची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महायुतीतुन उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणारे छगन भुजबळ गेल्या दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून असतानाच दुसरे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा तिकीट आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा व्यक्त केला आहे. पुढील दोन तीन दिवसांत म्हणजेच गुढीपाडवाच्या (Gudi Padwa 2024) आधी उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली आहे.
नाशिकची जागा शिवसेनेचीच
हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात नाशिकच्या जागेची उमेदवारी जाहीर केली जाईल. ही जागा शिवसेनेलाच सुटणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
उमेदवारी इलेक्टिव्ह मेरीटवर दिली जाईल
छगन भुजबळांचे नाव नाशिकसाठी फायनल झाल्याची चर्चा आहे. एक-दोन दिवसात त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. याबाबत हेमंत गोडसेंना विचारले असता ते म्हणाले की, महायुतीसाठी कुठलाही उमेदवार देताना प्रत्येक खासदार हा महत्वाचा आहे. त्यामुळे नाशिकची उमेदवारी इलेक्टिव्ह मेरीटवर दिली जाईल. जो उमेदवार निवडून येणारा आहे त्यालाच उमेदवारी मिळेल, असे त्यांनी म्हटले.
गुढी पाडव्याच्या अगोदर उमेदवारीची घोषणा
तुमच्या नावाची घोषणा कधीपर्यंत होऊ शकते अशी विचारणा केली असता हेमंत गोडसे म्हणाले की, गुढी पाडव्याच्या अगोदर म्हणजेच 9 तारखेच्या आधी उमेदवारीची घोषणा होईल. 10 वर्षात जी कामे केली, जो संपर्क ठेवला, जी काही गुणवत्ता निवडून येण्यासाठी लागते ते सर्व आमच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच शिवसेनेलाच नाशिकची उमेदवारी मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, उमेदवारीची घोषणा अद्याप झाली नसली तरी हेमंत गोडसे यांच्याकडून मतदार, प्रतिष्ठीत व्यक्तीच्या भेटीगाठी सुरू आहेत, 10 वर्षाच्या दोन टर्ममध्ये काय काम केली, त्याचा नावाचा कार्य अहवालाचे ही वाटप सुरू झाले आहेत.
आणखी वाचा
मोठी बातमी : शिंदेंचे 7 खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याच्या दाव्याने ट्विस्ट वाढला