एक्स्प्लोर

Rashid Sheikh Passed Away : हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपलं! 40 वर्षे राजकारणात सक्रिय, कोण होते रशीद शेख?

Malegaon News : मालेगावचे आमदार रशीद शेख यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

Former MLA Rashid Sheikh Passed Away : मालेगावचे (Malegaon) माजी आमदार रशीद शेख (Rashid Sheikh) यांचं निधन झालं आहे. रशीद शेख यांचं निधन झाल्याने दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आयेशा नगर कब्रस्तान येथे आज सकाळी 11 वाजता त्यांचा दफन विधी होणार आहे. हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून माजी आमदार शेख रशीद यांची ओळख होती. रशीद शेख मालेगाव मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिले होते. 25 वर्ष तत्कालीन आमदार राहिलेले स्व. निहाल अहमद यांचा त्यांनी पराभव केला होता. मालेगाव महानगर पालिकेचे महापौर पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळलेली होती. 

रशीद शेख यांचं वयाच्या 65 व्या वर्षी निधन

सोमवारी 4 डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अलिकडेच त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना मालेगावच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. पण, त्यांची तब्येत बिघडली. त्रास वाढल्यामुळे त्यांना नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलवलण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

40 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय

रशीद शेख मागील 40 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होते. त्यांनी जनतेचे अनेक प्रश्न सोडवत शहरात विविध पायाभूत सुविधा उभारल्या. शहरातच अनेक विकासकामे राबबली. त्यांनी पाणी आणि गटारे यांचा प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा दिला. यासोबत त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि विकासासंबंधित कामांना प्राधान्य देत जनतेसाठी निस्वार्थ मनानं काम केलं. त्यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार, महापौर आणि राज्यमंत्री अशा विविध पदांची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पडली. जनतेच्या मनात त्यांची 'आपला नेता' अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

रशीद शेख यांची कारकिर्द

हसतमुख, अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मालेगाव मतदार संघाचे दोन वेळा ते आमदार राहिले होते. 1999 मध्ये रशीद शेख यांनी मालेगावमधून 25 वर्षांहून अधिक काळ आमदार राहिलेल्या निहाल अहमद यांचा पराभव केला होता. त्यांनी अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष होते. रशीद शेख 2017 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. त्याआधी 1994 मध्ये नगराध्यक्ष होते. ते तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री पद दर्जाचे महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. 

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Land Scam : शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा
Chandrashekhar Bawankule: नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
नाशिकच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याची-त्याची जबाबदारी करण्यापेक्षा....
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget