एक्स्प्लोर

Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime News: आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत मिळावी यासाठी डायल 112 ह्या हेल्पलाइन नंबरवर सातपूर कंट्रोल रूमला दोन महिन्यात दोन वेगवेगळे फेक कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'डायल 112'या हेल्पलाइन नंबरचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहर पोलीस आयुक्तालय (Nashik City Police Commissionerate) हद्दीतील सातपूर पोलीस ठाण्याच्या (Satpur Police Station) हद्दीत समोर आला आहे. गेल्या दोन महिन्यांत सातपूर नियंत्रण कक्षाला दोन वेगवेगळे 'फेक कॉल' (Fake Calls) आल्याने पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Crime News: काय आहे नेमकी घटना?

सातपूर परिसरात एकाची हत्या झाली असून एकाच वेळी 5 ते 7 लोक गंभीर जखमी असल्याचा फोन डायल 112 द्वारे नियंत्रण कक्षात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून सातपूर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, तेथे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. हा कॉल संपूर्णपणे खोडसाळपणातून करण्यात आल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी माहिती देणाऱ्याचा शोध सुरू केला. या घटनेत पोलिसांना एका परप्रांतीय इसमाचा शोध घेण्यात यश आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Nashik Crime News: महिन्याभराने पुन्हा 'त्याच' घटनेची पुनरावृत्ती 

यानंतर अवघ्या महिन्याभरानंतर म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा एकदा सातपूर नियंत्रण कक्षाला डायल 112 वरून कॉल आला. यावेळी हाणामारीतून एकाची हत्या झाल्याची माहिती देण्यात आली होती. बातमी मिळताच पोलीस पथकाने पुन्हा घटनास्थळाकडे धाव घेतली, परंतु पूर्वअनुभवाप्रमाणेच तिथेही असा कोणताही प्रकार घडला नव्हता. सलग दुसऱ्यांदा पोलिसांची दिशाभूल झाल्याचे निष्पन्न झाल्याने सातपूर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Nashik Crime News: महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेवर पोलिसांचा खुलासा 

या फेक कॉलच्या घटनेत पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित व्यक्तीकडून हे कॉल केले जात असल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगली होती. मात्र, सातपूर पोलिसांनी या चर्चेचे खंडन करत स्पष्टीकरण दिले आहे.

Nashik Crime News: पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया 

"सातपूर नियंत्रण कक्षात किंवा बीट मार्शल पथकात कोणतीही महिला पोलीस कर्मचारी कार्यरत नाही. हा संपूर्ण प्रकार निव्वळ खोडसाळपणातून करण्यात आला असून, आपत्कालीन यंत्रणेची दिशाभूल केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Mumbai Police Salary Fraud : मोठी बातमी! चक्क मुंबई पोलीस दलातच वेतन घोटाळा; पगार काढणाऱ्यांचाच तब्बल साडेसहा कोटींवर डल्ला, पाच जणांविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget