Dhule News : शिरपूरचा शेतकरी चर्चेत, भुईमूंग अन् तुरीच्या पिकात गांजाची लागवड, धुळे पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त
Dhule Crime : भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
![Dhule News : शिरपूरचा शेतकरी चर्चेत, भुईमूंग अन् तुरीच्या पिकात गांजाची लागवड, धुळे पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त dhule Latest News Cultivation of ganja in bhuimung and turi crop, Dhule police seized ganja worth Rs 1 crore Dhule News : शिरपूरचा शेतकरी चर्चेत, भुईमूंग अन् तुरीच्या पिकात गांजाची लागवड, धुळे पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचा गांजा जप्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/20/b3e5d8acc2e33d2add71f4005be892341697795170858738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळे : धुळ्याच्या (Dhule) शिरपूरमधून धक्कादायक बाब उघडकीस आली असून भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकत संबंधित शेतमालकाला बेड्या ठोकल्या आहेत. तर दोन ठिकाणी छापे घालून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गांजा (Ganja) जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिक (Nashik) येथील ललित पाटील ड्रग्स प्रकरणातील (lalit Patil Case) सर्वच पोलीस ऍक्शन मोडवर आले असून धुळे जिल्हा (Dhule Police) पोलिस प्रमुख संजय बारकुंड यांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांनी वेगवगेळ्या दोन ठिकाणी कारवाई करत सुमारे 1 कोटी 5 लाखांचा गांजा जप्त केला. त्यामुळे गांजाची शेती करणाऱ्यांची धाबे चांगलेच दणाणले आहे. भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड केलेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर (Shirpur) तालुक्यात उघडकीस आणला. दोन ठिकाणी छापे घालून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून भिवखेड पाडा, बभळाज शिवारात वन जमिनीवर गांजाची बेकायदेशीर लागवड झाल्याची खात्री करण्यात आली. यानंतर सहायक निरीक्षक दीपक पावरा यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठविण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार महेश साळुंखे यांच्यासह रवाना झालेल्या या पथकाने मुसा पावरा याच्या शेतात तपासणी केली. मुसाने भुईमूग आणि तूरीच्या शेतात गांजासदृश्य वनस्पतीची लागवड केलेली आढळली. या छाप्यात 49 लाख 99 हजार 365 रुपयांची 1428.390 किलोग्रॅम वजनाची झाडे पथकाने जप्त केली.या प्रकरणी शामसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुसाविरूद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यात एक कोटींचा गांजा जप्त
दुसरी कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून हिसाळे येथील देवसिंग पावरा याच्या गोरक्षनाथ पाडा शिवारातील शेतात तपासणी करण्यात आली. तूर आणि कापूस पिकांत गांजाची लागवड केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकाने 56 लाख, आठ हजार 750 रुपयांची एक हजार 602 किलो गांजाची तीन ते सहा फुट उंचीची झाडे जप्त केली. याप्रकरणी देवसिंगविरूद्ध महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एका दिवशी दोन ठिकाणी धुळे पोलिसांनी गांजा लागवड होत असलेल्या ठिकाणी छापा टाकला. यात एका घटनेत 50 लाख तर दुसऱ्या घटनेत 56 लाखांचा मुद्देमाल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकट्या शिरपूर तालुक्यात एक कोटींचा गांजा जप्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
इतर महत्वाची बातमी :
Dhule : कापूस आणि तूर शेतीच्या गांजा पिकवला; पोलीस कारवाईत एक कोटीचा मुद्देमाल जप्त
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)