एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडविणारा 'तो' नक्की कोण? समोर आली मोठी माहिती

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळ फार्मवर ड्रोन फिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता ड्रोन नक्की कोणी फिरवला याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

Chhagan Bhujbal : नाशिकमधील लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रणशिंग फुंकले आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्यात रस्सीखेच सुरु असतानाच भुजबळ फार्मवर (Bhujbal Farm) ड्रोन फिरल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता ड्रोन (Drone) नक्की कोणी फिरवला याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भुजबळ फार्मवर ड्रोन उडविण्यात आला होता. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. याबाबत भुजबळ फार्मवरील कर्मचाऱ्यांनी पोलिसांत (Police) तक्रार दाखल केली होती. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर अंबड पोलिसांकडून (Ambad Police) भुजबळ फार्मची पाहणी करून भुजबळ फार्मबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा निघाला फोटोग्राफर

आता भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडवणारा एक फोटोग्राफर (Photographer) असल्याची माहिती समोर येत आहे. विनापरवानगी ड्रोन उडविणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित पवन राजेश सोनी (Pawan Soni) (29, रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हा फोटोग्राफर असून, त्याने दि. 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भुजबळ फार्म परिसरात कुठलीही परवानगी न घेता ड्रोन उडविला होता, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे (Kiran Raundle) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

नाशिक लोकसभेसाठी नक्की कोणाला उमेदवारी? 

दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ इच्छुक आहेत. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. मात्र आता महायुतीकडून भुजबळ, गोडसे यांच्या व्यतिरिक्त पर्याय शोधला जात आहे. भाजप आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikale) आणि शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता महायुतीतून नाशिक लोकसभेसाठी नक्की कोणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता? जरांगेंनी नाशकातून भुजबळांवर डागली तोफ!

'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रमMumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहितीMumbai Boat Accident : नेवीच्या स्पीट बोटने जोरात ठोकलं,बोटीच्या मालकानं धक्कादायक माहितीGate Way of India Boat Accident : चक्कर मारुन टक्कर दिली, बोट अपघाताचा थरारक VIDEO

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget