![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Malegaon News : निवडणुकीच्या कामात कसूर, मालेगावमध्ये 14 बीएलओंवर गुन्हा दाखल
Malegoan News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे, फोटो वगळणे सुरु आहे. कामात कसूर केल्याने मालेगाव बाह्य मतदारसंघात 14 बीएलओंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![Malegaon News : निवडणुकीच्या कामात कसूर, मालेगावमध्ये 14 बीएलओंवर गुन्हा दाखल case registered against 14 BLO in Malegaon nashik maharashtra marathi news Malegaon News : निवडणुकीच्या कामात कसूर, मालेगावमध्ये 14 बीएलओंवर गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/01/8671d6fcd29a886f29ca488f6c5167811704125267354211_original.avif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Malegoan News मालेगाव : निवडणूक (Election) कामात कसूर केल्याच्या आरोपावरून मालेगाव बाह्य मतदारसंघात (Malegaon Outer Constituency) कामकाज करणाऱ्या १४ बीएलओंवर (BLO) छावणी पोलीस ठाण्यात (Chavani Police Station Malegaon) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर मतदारयाद्यांचे शुद्धीकरण, दुबार नावे, फोटो वगळणे आदी कामकाज सुरु आहे. मतदान प्रक्रियेशी निगडित कामे प्रथम प्राधान्याने करणे अपेक्षित असताना १४ बीएलओंनी संबंधित कामकाज पूर्ण केले नाही.
तसेच आढावा बैठकांना सातत्याने गैरहजर राहून कामाकडे दुर्लक्ष केले. निवडणूक कामकाजासंदर्भात संबंधितांनी नोटीस (Notice) बजावून देखील या १४ बीएलओंनी प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी दुसऱ्या बीएलओंची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती तहसीलदार नितीनकुमार देवरे (Tehsildar Nitin Kumar Deore) यांनी यांनी दिली आहे.
वारंवार सूचना देऊनही दाद दिली नाही
मालेगाव बाह्य मतदारसंघात एकूण ३३१ बुथस्तरावर बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेशी निगडित कामे प्रथम प्राधान्याने करणे अपेक्षित आहे. १४ बीएलओंनी मतदारयादीशी संबंधित कामकाज व घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी केली नाही. त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नोटीसही बजावल्या होत्या. त्यालाही त्यांनी दाद न देत कामात कसूर करण्याचे धोरण कायम ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामात कसूर करणाऱ्यांची गय करणार नाही
निवडणुकीच्या कामात प्रत्येक कर्मचाऱ्याने जबाबदारीने आपले कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे. कामात कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे तहसीलदार तथा मालेगाव बाह्यचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी देवरे यांनी सांगितले आहे.
ट्रकच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड शिवारात ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. यामुळे दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भूपेश तिलकसिंग लोधी व त्याचा मित्र हे दोघे दुपारी दुचाकीने नाशिककडून धुळ्याकडे जात होते. यावेळी राहुड घाटाच्या अलीकडे असलेल्या गतिरोधकाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी चांदवड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Police : नाशिक पोलिसांच्या कर्तव्याला सलाम! तब्बल तीन कोटींचा मुद्देमाल मालकांना केला परत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)