एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून भुजबळ-गोडसेंमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच भाजप पुन्हा आक्रमक, दिला गंभीर इशारा

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघावरून भुजबळ - गोडसे यांच्या रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. यामुळे महायुतीत तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघात महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. या जगाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपकडून नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. शिवसेनेकडून हेमंत गोडसे (Hemant Godse) आणि राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात रस्सीखेच सुरु असताना आता यात भाजप पुन्हा आक्रमक झाली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसेंना जाहीर केली होती. यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, असे संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक वाढली होती. त्यामुळे गोडसे मुंबईत दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. 

नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर...

आता नाशिक लोकभेच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असताना भाजपाने उडी घेतली आहे. नाशिकच्या जागेवरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील काही मंडळ अध्यक्षांनी राजीनाम्याचा देण्याचा इशारा दिला आहे. नाशिकची जागा भाजपाला नाही दिली तर राजीनामा देणार, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असताना आता पुन्हा भाजप आक्रमक भूमिका घेतल्याने नक्की नाशिकची जागा कुणाला मिळणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सकल मराठा समाजाकडून छगन भुजबळांना विरोध 

दरम्यान, नाशिकला छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांना विरोध सुरु झाला आहे. सकल मराठा समाजाकडून भुजबळांना विरोध केला जात आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या भुजबळ यांना मतदान न करण्याचे आवाहन करण्याऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. तसेच रस्त्यांवर भुजबळांच्या विरोधात होर्डींग्स लावण्यात आले आहेत.  भुजबळांविरोधात मराठा समाज एकवटल्याचे चित्र आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!

Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSantosh Deshmukh Beed : संतोष देशमुख हत्येचं प्रकरण, जातीयवादाचं वळण Rajkiya Sholey Special ReportFadnavis Varsha Bungalow : वर्षा बंगला,काळी जादू अन् टोपलीभर लिंबू Rajkiya Sholey Special ReportShivraj Rakshe Maharashtra Kesari : आखाड्यात कुस्ती हरली? राजकीय आखाडा कुणामुळे? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
गाव असू नायतर मुंबई, शासकीय कार्यालयात मराठीतच बोलायचं, बोर्डही लावायचा; शासन आदेश जारी
Shirdi : दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
दोघांची हत्या, एकावर गंभीर वार केले; दुहेरी हत्याकांडाने शिर्डीत खळबळ, पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
फडणवीस-शिंदे-फडणवीस; नाना पाटेकरांनी सांगितला 'नाम'चा प्रवास; गावागावात भेट देणार
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुंबईच्या जेलमध्ये भेटले, प्लॅन ठरला, सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये, 65 हजार लोकं येणार; जिल्ह्यातील मंत्र्यांबाबत सुरेश धसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके मतदार आले कुठून? संसदेत राहुल गांधी आक्रमक  
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
Embed widget