नाशिकची गुन्हेगारी काही कमी होईना, शर्ट चोरला म्हणून रात्रभर बेदम मारहाण
Crime News: दोन दिवसापूर्वी डॉक्टरवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता शर्ट चोरला म्हणून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Nashik Latest Crime News update: वर्ष सरत आलं, मात्र नाशिकची गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीत. दोन दिवसापूर्वी डॉक्टरवर हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता शर्ट चोरला म्हणून कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून हल्ले, मारहाण आदी घटना नित्याच्या झाल्या आहेत. अशातच नाशिक शहरातील प्रसिद्ध कपडे शोरूम मध्ये कर्मचाऱ्यास मारहाणीची घटना घडली आहे. या कपड्याच्या शोरूममध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर शर्ट चोरल्याच्या आरोप लावून गंभीर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल वावूळकर असं मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विशाल हा शहरातील प्रसिद्ध कपडे शॉप मध्ये काम करत आहे. मात्र शर्ट चोरला म्हणून या कर्मचारी विशाल यास रात्रभर अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या ठक्कर डोम च्या बाजूला असलेल्या व नव्याने सुरू झालेल्या शॉपमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मालकासह बाऊन्सर आणि सिक्युरिटी गार्डने कर्मचाऱ्यास डांबून ठेवत रात्रभर मारहाण केल्याचे सामोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मालकासह बाऊन्सर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल वावूळकर अस मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून दुकानातील मालकासह बाउन्सरवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत जखमी विशालवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात अधिक उपचार सुरू आहे. तर संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी मारहाण झालेल्या विशाल आणि त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
अशा प्रकारे एखाद्याला मारहाण करणे हे कितपत योग्य आहे. जेवढी मारहाण या तरुणाला करण्यात आली आहे. तेवढी मोठी चुकी पीडित तरुणाची होती का असे सवाल या निमित्ताने उपस्थित आहे. एकीकडे धार्मिक नागरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक शहर आता क्राईम कॅपिटल कडे झुकत चालल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.
ही बातमी देखील वाचा...
हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत, अधिवेशन या मुद्द्यांनी गाजलं...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
