एक्स्प्लोर

Nashik Accident : एकुलत्या एक जोयावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा रस्त्यावर टाहो... परिसरात हळहळ 

Nashik Accident : नाशिक शहरातील पंचवटी भागातील दिंडोरीकडे जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र दिनी अपघात झाला आहे.

Nashik Accident News : दोन दिवसांपूर्वी वणी सापुतारा मार्गावर (Vani Saputara Highway) पिकअप वाहून उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज नाशिक शहरातील दिंडोरी रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका आठ वर्षीय चिमुरडीला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होत चालकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. 

नाशिक शहर (Nashik) आणि जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा बघता अनेक भागांत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. तर अपघातांच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत आहे. यात अनेकदा लहान बालकांचा समावेश अधिक असल्याचे मागील काही अपघाताच्या घटनांवरून दिसून येत आहे. नाशिक शहरातील पंचवटी भागातील दिंडोरीकडे जाणाऱ्या मार्गावर महाराष्ट्र दिनी अपघात झाला आहे. चार चाकी वाहनाच्या धडकेत लहान चिमुरडी चिरडली (Death) गेल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून संतप्त झालेल्या नागरिकांनी अपघातग्रस्त वाहनांची तोडफोड करत चालकाला मारहाण केल्याचे समजते आहे. 

पंचवटी परिसरात (Dindori) असलेल्या दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी जवळ हा अपघात घडला. महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Day) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास इंट्रा या चारचाकी मालवाहू वाहनाखाली दिंडोरी मार्गावर जात असताना याच वेळी समोरून वाहनाखाली जोया सलीम शेख ही आठ वर्षीय बालिका आल्याने तिचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चिमुरडीचा मृत्यू झाला होता. यावेळी संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त वाहनाची तोडफोड करीत चालकाला देखील मारहाण केली. अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गर्दीमुळे काहीकाळ दिंडोरीरोड मार्गावर वाहतुक खोळंबल्याचे चित्र होते.  

अपघातांनंतर जमाव संतप्त 

दरम्यान जोया हिच्या डोक्यावरून गाडी गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अति शीघ्र दलाचे पथक पाचारण करण्यात आले होते. अवधूत वाडी ते मायको दवाखाना या परिसरात अपघात झाल्यानंतर जवळपास पाचशे ते सहाशे जणांचा जमाव जमला होता. परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर जमाव पांगल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली. 

घरात एकुलती एक मुलगी 

आठ वर्षीय बालिका जोया शेखचा अपघातात मृत्यू झाल्याने तिच्या वडिलांनी रस्त्यावरच मृत्यूचा हंबरडा फोडला. अपघातात बालिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी जोयाचे नातेवाईक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी इंट्रा चारचाकी वाहन चालकास ताब्यात घेतले आहे. अपघातात मृत्यू झालेल्या जोया शेख हीचे वडील सलीम शेख हे अवधूत वाडी येथील सुलभ शौचालयाचा सांभाळ करत होते. तसेच डाळींब मार्केट येथे पॅकिंगचे देखील काम करीत होते. पती पत्नी आणि मुलगी असा त्यांचा परिवार होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget