(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकचा तिढा दोन दिवसात संपेल, आमच्या मनातलाच उमेदवार जाहीर होणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचं मोठं वक्तव्य
Nashik Lok Sabha : एकीकडे नाशिकच्या जागेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी जोर लावला आहे. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळदेखील नाशिकच्या जागेवर आग्रही आहेत.
Nashik Lok Sabha Election 20024 : नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी प्रचारालाही जोरदार सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महायुतीत मात्र नाशिकच्या जागेवरून अद्याप तिढा कायम आहे.
एकीकडे नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीदेखील नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच भाजपकडून देखील या जागेसाठी आग्रह सुरु आहे. गुरुवारी सकाळीच छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेवर मीच लढावं, अशा सूचना अजित पवारांना दिल्लीतून आल्याचे म्हटले आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी देखील नाशिकच्या जागेवरून मोठं वक्तव्य केले आहे.
दोन दिवसात नाशिक लोकसभेचा तिढा सुटणार
अमोल मिटकरी म्हणाले की, महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे चित्र जरी असेल तरी महायुतीचे जागावाटप अजूनही रखडले असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजून का सुटत नाही, यावरदेखील चर्चा सुरु आहेत. दोन दिवसात नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला दिसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनातलाच उमेदवार नाशिकच्या जागेवर असेल, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
संजय मंडलिकांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे समर्थन नाही
आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत, असे वक्तव्य खासदार संजय मंडलिक यांनी केलं आहे. यावर अमोल मिटकरी म्हणाले की, कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांचे वंशज यांच्याबद्दल केलेले विधान वादग्रस्त आहे. त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. राष्ट्रवादीही त्याचे समर्थन करणार नाही. पण या निमित्ताने मी उदयनराजे महाराजांचे वंशज आहेत का? याचे पुरावे मागणारे संजय राऊत यांची आज काय भूमिका आहे. काँग्रेसचे संजय राऊत यांच्याबद्दल काय म्हणजे आहे. हेही या निमित्ताने कळू द्या, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले.
इतर महत्वाच्या बातम्या
छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठामच! अजित पवारांचं नाव घेत केला मोठा दावा
Chhagan Bhujbal : भुजबळ फार्म परिसरात ड्रोन उडविणारा 'तो' नक्की कोण? समोर आली मोठी माहिती