छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठामच! अजित पवारांचं नाव घेत केला मोठा दावा
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप महायुतीत सुटलेला नाही. आता मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेबाबत मोठा दावा केला आहे.
Chhagan Bhujbal : एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) मात्र या जागेवरून अद्याप तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्याकडून नाशिकच्या जागेसाठी जोर लावला जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) रणशिंग फुंकले आहे.
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. मात्र या घोषणेनंतर महायुतीत नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजपकडून देखील नाशिकमध्ये अधिक ताकद असल्याचे म्हणत या जागेसाठी आग्रह धरला. तर भुजबळांकडून दिल्लीहून माझ्या उमेदवारीची चर्चा झाली, असे सांगत नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
अजित पवार नाशिकच्या जागेसाठी आग्रही
नाशिकच्या जागेसाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) आग्रह धरला आहे. या जागेवर मलाच उमेदवारी द्या, अशा सूचना वरून आल्याचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे. तर नाशिकच्या जागेवर कमळ चिन्हावर लढणार असल्याच्या बातम्या साफ खोट्या असल्याचंही भूजबळांनी यावेळी स्पष्ट केलंय.
नाशिकच्या जागेवर छगन भुजबळांनाच उमेदवारी द्या
छगन भुजबळ कमळ चिन्हावरून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. याबाबत छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, ही सगळी खोटी बातमी आहे. त्याला कशाचाही आधार नाही. अजित दादांनी ही जागा मागितली आहे. अजित दादा प्रफुल्ल पटेल यांचे सांगणं आहे की, ती जागा घ्यायची असेल तर घ्या परंतु छगन भुजबळांनाच तिथेच उभे करा. यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. नावाची घोषणा कधी होणार असे विचारले असता जेव्हा करायची तेव्हा करतील. महायुतीचे सगळे लोक ठरवतील. आपली निवडणूक शेवटी आहे, असे त्यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या पाठींब्यामुळे महायुतीची ताकद वाढणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बिनशर्त पाठींबा जाहीर केला. यावर छगन भुजबळांना विचारले असता ते म्हणाले की, एक कार्यकर्ता आल्यावर आपल्याला आनंद होतो. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा सुद्धा लोक माणसावर प्रभाव आहे. त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे महायुतीची ताकद निश्चितपणे वाढणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा