एक्स्प्लोर

Nashik News : नाशिक जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार, घोटी पोलिसांचा छापा, साडेचार लाखांचा तांदूळ जप्त 

Nashik News : तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील राईस मिलवर छापा टाकण्यात आला आहे.

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार (Ration) या पूर्वी देखील अनेक घटनांमधून अधोरेखित झाला आहे. अशातच राज्यात तांदळाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील राईस मिलवर छापा टाकण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिकसह राज्यभरात रेशनकार्ड (Ration Card) धारकांना दरमहा रेशन पुरविले जाते. यासाठी गोदामाच्या माध्यमातून हा धान्यसाठा संबंधित वितरकांकडे पुरवला जातो. त्यानंतर गावपातळीवर त्याचे वाटप केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत यातील धान्यसाठ्यात अफरातफर करून विक्री केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरात अशीच एक घटना घडली होती. आता स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील घोटी शहरात (Ghoti) कारवाई केली आहे. येथील व्यापारी भाकचंद केशरमल पिचा यांच्या राइस मिलमध्ये हा छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत टेम्पोत लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ (Rice) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान घोटी पोलीस ठाण्यात संबंधित मिल मालक, टेम्पोचालक आणि विक्रेता या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या पथकाने या छाप्यात 4 लाख 29 हजार 260 रुपये किमतीचा 16 हजार 900 किलो वजनाचा तांदूळ जप्त केला. अवैध धंद्यांवर घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करीत असताना पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीबाबत त्यांनी केडगाव  येथून रेशन दुकानातून जमा केलेला जुना तांदूळ एफसीआयचे गोण्यांमधून काढून, गोण्या नष्ट करून हा रेशनचा जुना तांदूळ वेगवेगळ्या कंपन्यांच्या गोण्यांमध्ये भरून तो घोटी गावात खुल्या बाजारात विक्री करिता येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. 

पावती वेगळी, टेम्पोत वेगळाच माल

दरम्यान टेम्पो चालकाकडे असलेल्या पावतीप्रमाणे साईल, 171 नग, 10,070 किलो वजन व 2540 रुपये दर असा एकूण 2 लाख 55 हजार 778 रुपये किंमत असलेली चेतन ट्रेडर्स कंपनी, किराणा भुसार मालाचे व्यापारी अशी पावती सादर केली. मात्र, बिलाप्रमाणे ही गाडी चेक केली असता या टेम्पोमध्ये जुना रेशनचा तांदूळ माल दिसून आल्याने त्यांनी पुरवठा विभागातील निरीक्षक पी. डी. गोसावी, पुरवठा निरीक्षक अधिकारी बी. आर. डोणे यांच्या समक्ष टेम्पोची तपासणी केली. टेम्पोमध्ये प्रत्यक्षात 4 लाख 29 हजार रुपये किमतीच्या रेशनच्या जुन्या तांदळाचे सफेद, पोपटी, लाल, आकाशी, नारंगी अशा वेगवेगळ्या रंगांच्या एकूण 290 गोण्या मिळून आल्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget