Nandurbar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन भाऊ आमनेसामने
Nandurbar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या धडगाव तालुक्यातील पराडके परिवारातही दोन गट झाल्याचे चित्र आहे.
![Nandurbar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन भाऊ आमनेसामने Nandurbar News After the split in the Shiv Sena the two brothers came face to face Nandurbar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन भाऊ आमनेसामने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/29/8dd0b7626f1ec27ad700c20f8608cb8e1659066880_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nandurbar News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट झाले आहेत. त्यात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक असे गट पडले आहेत. मात्र अनेक नेत्यांच्या घरातही फूट पडल्याचे चित्र राज्यात पाहण्यास मिळाले. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या धडगाव तालुक्यातील पराडके परिवारातही दोन गट झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान सभापती तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या शिवसेनेत आहेत तर त्याच्या कुटुंबातील मोठे बंधू विजय पराडके आणि समर्थक नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला आहे. त्यामुळे परडके परिवारातही दोन गट पाहण्यास मिळत आहे.
शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) गट स्थापन केल्याने राज्यात शिवसेनेचे दोन गट निर्माण झालेले आहेत. मात्र दोन्ही गट न्यायालयात गेल्याने खरी शिवसेना कोणाची यासाठी जुळवाजुळवी सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही नेते मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जात आहेत तर काही मंडळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपलं समर्थन देताना दिसून येत आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दोघी भावांनी वेगवेगळे गटाला समर्थन दिल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगलेली आहेत.
जिल्हा परिषद सदस्य असलेले विजय पराडके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आहे तर कृषी सभापती असलेले गणेश पराडके यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन दिल्याने आता धडगाव तालुक्यात दोन भाऊ आमने-सामने उभे राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
बुलढाण्यात खासदार प्रतापराव जाधव शिंदे गटात तर धाकटा भाऊ उद्धव ठाकरेंसोबत
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे धाकटे भाऊ आणि मेहकरचे माजी नगराध्यक्ष व गट नेता संजय जाधव यांनी आपल्या खासदार भावाची साथ सोडली आहे. संजय जाधव हे अजूनही मूळ शिवसेनेतच आहेत. प्रतापराव जाधव यांनी मागील निवडणुकीत उपनगराध्यक्षपद हे आपल्या भावाला न देता शिवसेनेच्या शहर अध्यक्षाला दिल्याने संजय जाधव हे नाराज होतेच. आता उद्धव ठाकरे हेच माझे नेते आहेत असं सांगून मी मूळ शिवसेनेतच शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मात्र खा.प्रतापराव जाधव यांच्या घरातच सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.
जळगावात आमदार भाऊ शिंदे गटात, बहिणीचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
शिवसेनेसोबत बंडखोरी करत आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. असं असताना दुसरीकडे मात्र कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या आमदार किशोर पाटील यांची चुलत बहीण वैशाली नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केलं. वैशाली सूर्यवंशी या कट्टर शिवसैनिक स्वर्गीय माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या आहेत. आर. ओ. पाटील हे किशोर पाटील यांचे काका असून आर. ओ. पाटील यांच्यामुळेच किशोर पाटील राजकारणात आले आणि आमदार होऊन आज या पदापर्यंत पोहोचले आहेत. कधीही राजकारणात सक्रिय नसलेल्या वैशाली सूर्यवंशी यांचे अचानक उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा फलक झळकल्याने खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)